चंद्रपुरात निर्घृण हत्या , 8 संशयितांना वर्धेतून अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

श्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830856351

चंद्रपूर, 8 नोव्हेंबर, दुर्गापूर येथील महाऔष्णिक वीज केंद्राच्या मेजर गेटजवळील नायरा पेट्रोल पंपजवळ मुख्य रस्त्यावरच जुन्या वैमनस्यातून जवळपास 7 ते 8 आरोपींनी महेश मेश्राम (32, रा. आयप्पा मंदिर परिसर) याची धारदार शस्त्राने हत्या करून धडावेगळे शीर काही अंतरावर फेकून दिले. ही निर्घृण हत्या सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. या खळबळजनक घटनेनंतर पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि वेगाने तपास चक्र फिरवीत 8 संशयितांना वर्धेतून लगेच अटक करण्यात आली. मृतक महेश मेश्राम हा ईमली बार येथे आपल्या मित्रांसोबत गेला असता, आरोपींनी त्याच्यावर पाळत ठेवून तिकडे त्याला घेराव घातला आणि धारदार शस्त्रांनी वार करून ठार केले. त्याचे शीर निर्दयीपणे धडावेगळे करून घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर फेकून पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. आरोपींविरूद्ध कलम 302, 143, 147, 149, 427 भादंवि सहकलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस अधीक्षक परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. आणि आरोपींंचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे यांच्यासह अंमलदारांची चार विशेष शोध पथके गठित करण्यात आली. या पथकांनी अज्ञात आरोपींचे नाव व त्यांच्या ठावठिकाण्याबाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रिक तपास सुरू केला असता, यातील संशयित आरोपी हे वर्धा जिल्ह्यात स्कॉर्पिओ गाडीने पळून जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यावरून या पथकाने पाठलाग केला आणि वर्धा जिल्ह्यातील आरंभा टोलनाका येथे दोन वाहने आडवी लावून स्कॉर्पिओ गाडी अडविली व अतुल मालाजी अलीवार (22, रा. समतानगर वार्ड क्रमांक 6, दुर्गापूर), दीपक नरेंद्र खोब्रागडे (18, रा. समतानगर वार्ड क्रमांक 6, दुर्गापुर), सिध्दार्थ आदेश बन्सोड (21, रा. नेरी, दुर्गापूर), संदेश सुरेश चोखान्द्रे (19, रा. सम्राट अशोक वार्ड क्रमांक 2, दुर्गापूर), सुरज दिलीप शहारे (19, रा. समतानगर वार्ड क्रमांक 6, दुर्गापूर), साहेबराव उत्तम मलिये (45, रा. नेरी समतानगर वार्ड क्रमांक 6, दुर्गापूर), अजय नानाजी दुपारे (24, रा. उर्जानगर, दूर्गापूर) व प्रमोद रामलाल सूर्यवंशी (42, राउजीनगर, दुर्गापूर) अशा एकूण 8 संशयित आरोपींना वाहनासह अवघ्या काही तासात ताब्यात घेतले.

या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत आणून त्यांच्याकडून गुन्हयाबाबत चौकशी केली असता यातील संशयित आरोपी 6 जणांचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असून, यातील आरोपी अजय दुपारे, प्रमोद सुर्यवंशी यांनी आपल्या ताब्यातील चारचाकी स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच 04, जिझेड 9091 ने आरोपींना पळून जाण्यास मदत केली असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना पुढील तपासासाठी दुर्गापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

तपास दुर्गापूर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, संदीप कापडे, मंगेश भोयर, पोलिस उपनिरीक्षक कावळे, पोलिस हवालदार संजय आतकुलवार, धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, नितीन साळवे, सुभाष गोहोकार, संतोष येलपुलवार, जमीर पठाण, मलिंद चव्हाण, गजानन नागरे, अजय बागेसर, गोपाल आतकूलवार, नितीन रायपुरे, रवींद्र पंधरे, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, मिलींद जांभुळे, प्रशांत नागोसे, गोपीनाथ नरोटे, महीला अंमलदार अपन मानकर तसेच सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार मुजावर अली यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here