अनुदानित आश्रमशाळांच्या अध्ययनस्तर तपास कार्यक्रमात बदल •सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नाला यश

44

अनुदानित आश्रमशाळांच्या अध्ययनस्तर तपास कार्यक्रमात बदल
•सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नाला यश

अनुदानित आश्रमशाळांच्या अध्ययनस्तर तपास कार्यक्रमात बदल •सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नाला यश

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 8 नोव्हेंबर

निपूण भारत कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनदानित आश्रमशाळांना भेटी देवून अध्ययन स्तर तपासण्याबाबतचा कार्यक्रम आदिवासी विकास नागपूरचे अपर आयुक्त यांनी जाहीर केला होता. हा कार्यक्रम आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गैरसोयीचा असल्याने या कार्यक्रमात बदल करण्यात यावा, अशाप्रकारचे निवेदन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे, सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी अपर आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आश्रमशाळांचा अध्ययनस्तर तपास कार्यक्रमात बदल करण्यात आले. आदिवासी विकास नागपूरअंतर्गत समाविष्ठ सर्व अनुदानित आश्रमशाळेत निपुण भारत कार्यक्रमांतर्गत भविष्य वेधी शिक्षण उपक्रम राबविण्याकरीता आपल्या स्तरावरून नियोजन करून प्रकल्प स्तरावरून अधिकारी, कर्मचार्‍यांव्दारा 9 व 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत भेटी देवून एकत्रित अहवाल 14 नोव्हेंबर 2022 रोजी मागविण्यात आला होता. परंतु, दिवाळीनंतर आश्रमशाळांच्या दुसर्‍या सत्राची सुरूवात 7 नोव्हेंबर 2022 पासून होत आहे. दीर्घ सुट्टीनंतर शिक्षकांना प्रत्यक्ष पालकापर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांना शाळेत आणावे लागते ही वस्तूस्थिती असून, आदिवासी तथा अतिदुर्गम अशा छोट्या छोट्या गावातून विद्यार्थी हे आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात. अशा विद्यार्थ्यांना पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही सर्व वस्तूस्थिती लक्षात घेता नियोजित तपासणी कालावधीमध्ये अंशतः बदल करून ही तपासणी कमीतकमी पंधरा दिवसांनतर करावी व त्या दृष्टीने नियोजन करावे, अशी विनंती या निवेदनातून केली होती. या निवेदनाची दखल घेवून सर्व अनुदानित आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तसेच अध्ययन स्तर तपासणीकरीता नियोजन करून प्रकल्प स्तरावरून अधिकारी, कर्मचार्‍यांव्दारा 21 व 22 नोव्हेंबर या कालावधीत भेटी देण्यात याव्या व भेटीबाबतचा एकत्रित अहवाल 24 नोव्हेंबर रोजी सादर करावा, असे सुचविले आहे. विदर्भ माध्यमिक संघटनेच्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल अप्पर आयुक्तांचे अडबाले यांनी आभार मानले आहे.