प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम येथे कर्मचाऱ्यांना निरोप समारंभ
महेश बुरमवार
मुलचेरा प्रतिनिधी
मो.न.9579859379
मुलचेरा- तालुक्यातील लगाम येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम येथील बदली झालेल्या कर्मचार्यांना एका समारंभात निरोप देण्यात आला. दि. 05/11/2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जावेद शेख सर होते.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ.गेडाम सर , डॉ.समरीत सर , आरोग्य विस्तार अधिकारी ए.टी.विश्वास आदी उपस्थित होते.. कार्यक्रमात बदली झालेल्या कर्मचार्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम येथे कार्यरत असतांना योग्य प्रकारे काम करत जनसामान्यां पर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचे कार्य अगदी योग्य प्रकारे केले असे मनोमन प्रमुख अतिथीनी केले.
बदली कर्मचाऱ्यांमध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गजानन देवकर सर , आरोग्य सहायिका विद्या डोंगरे , आरोग्य सेविका पोवरी आतलामी ,एम.एस.जांभुळकर आदींची बदली झाल्याने त्यांना पुष्पगुच्छ, श्रीफळ,व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.यावळी सन्मानित कर्मचार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम येथील कर्मचारी स्टाफ सर्व उपस्थित होते.