चांदोरे ग्रामपंचायत निवडणुक बिन विरोध. ६५ वर्षाची परंपरा कायम.
🖊️नंदकुमार चांदोरकर🖊️
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील चांदोरे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. गेल्या ६५ वर्षाची परंपरा या गावातील ग्रामस्थांनी यंदाही कायम राखली आहे. चांदोरे ग्रामपंचायतीचे विशेष म्हणजे या गावात १९५८ पासून एकदाही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झालेले नाही. यंदा देखील चांदोरे हे जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध निवडणूक होणारे गाव ठरले आहे.