देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या साथीने चंद्रपूरातील विकास पर्वाला आणखी गती मिळेल : किशोर जोरगेवार

115
देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या साथीने चंद्रपूरातील विकास पर्वाला आणखी गती मिळेल : किशोर जोरगेवार

देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या साथीने चंद्रपूरातील विकास पर्वाला आणखी गती मिळेल : किशोर जोरगेवार

देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या साथीने चंद्रपूरातील विकास पर्वाला आणखी गती मिळेल : किशोर जोरगेवार

• लाडकी बहिण योजना बंद व्हावी म्हणून सावत्र भाऊ कोर्टात गेले होते : देवेंद्र फडणवीस

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 9 नाव्हेंबर
महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी कोहिनूर तलाव येथे फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी उमेदवार आमदार किशोर जोरगेवार, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, फग्गनसिंग फुलस्ते, श्रीनिवास गोमासे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक जीवतोडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, जिल्हा महानगर महामंत्री रामपाल सिंग आदींची उपस्थिती होती.
ज्यांना लाडक्या बहिणींचा आता ज्यांना पुळका आला ते नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निकटवर्तीय, सावत्र भाऊ आमची लाडकी बहिण योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले होते. आम्ही लढलो आणि न्यायालयाने योजना कायम केली. आता आमचे सरकार येताच या योजनेतून महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रूपये महिना देणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या विकासकामांना आम्ही मंजुरी दिली. यातील पहिला टप्पा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी 240 कोटी रुपयांचा निधी दिला. पुढल्या वर्षी होणार असलेल्या माता महाकाली महोत्सवापर्यंत या परिसराचा चेहरा बदललेला असेल. मागच्या काळात कापूस, सोयाबीनचे भाव कोसळले. यातून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली. हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकर्‍यांना दिली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही तर येत्या काळात हमीभावापेक्षा कमी दर शेतकर्‍यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करणार आहोत, असे वचनही फडणवीस यांनी यावेळी दिले.
तर जोरगेवार म्हणाले, बाबूपेठ उड्डाणपूल, रस्ते, अभ्यासिका, समाज भवन यांसारखी अनेक कामे आपण पूर्ण केली आहेत. आणखी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपची मला साथ आहे. त्यामुळे चंद्रपूरातील विकास पर्वाला आणखी गती मिळेल. चंद्रपूरातील प्रदूषण आणि पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. हंसराज अहिर यांचेही भाषण झाले.

• देवेंद्र फडणवीस यांनी ‘अम्मा’ला वाहिली आदरांजली

जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर दौर्‍यावर असताना, त्यांनी जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई उर्फ ‘अम्मा’ यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी फडणवीस यांनी ‘अम्मा का टिफिन’ उपक्रमाची पहाणी करीत कौतुक केले.