दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ हिंगणघाट येथे निघाला मोर्चा.

आंदोलनाला विविध पक्ष व संघटनेच्या वतीने देण्यात आला पाठिंबा.

मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट:- 8 डिसेंबर भारत सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी तीन विधायक कामगार विरोधी विधेयक रद्द करण्याबाबत तसेच दिल्ली येथील शेतकऱ्यांचे चालू असलेल्या आंदोलनाला समर्थन देऊन शेतकरी विरोधी काळ या कायद्याच्या निषेधार्थ आणि भारत बंदच्या समर्थनार्थ हिंगणघाट येथे महाविकास आघाडी व इतर संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या किसान मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.

दिल्ली येथे होत असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी भारत बंदचे आव्हान करण्यात आले हिंगणघाट येथे सुद्धा शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून हिंगणघाट समुद्रपुर तालुक्यातील शेतकरी यांनी भारत बंदचे आयोजन केले आहे. त्यांना महाविकास आघाडी व इतर संघटनेच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहीर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चा काढण्यात आला व केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी देत मोर्चा तहसील कार्यालय येथे धडक देत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


केंद्र सरकार कडे आमची मागणी आहे की तीन कृषि विधेयक सरकारने पारित केले आहे ते शेतकऱ्यांकरिता नुकसानकारक आहे त्यामुळे हे तिन्ही विधेयक त्वरित रद्द करावे व शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांना करण्यात आली. मोर्चात सहभागी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे काँग्रेसचे बाळू महाजन, राजू मंगेकर, प्रलय तेलंग, अशोक रामटेके, सुरेश मुंजेवार, भूषण पिसे, दिनेश वाघ, राजेंद्र धोटे, श्याम येडपवार, आफ्ताब खान, शकील अहमद, ज्वालंत मून, कुंडलिक बकाने व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here