राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विठूमाउली भक्तांना उपवास फराळ वाटप.

52

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

एकादशी म्हटल तर विठू रायाच्या भोळ्या भाबड्या भक्तांना आपल्या माऊलीच्या भेटीची आस असते.हीच आस मनी घेऊन रात्रंदिवस जीवाची पराकाष्ठा करत संपूर्ण वारकरी संप्रदाय पंढरपूर,आळंदी,देहू वाटेने माऊलीच्या भेटीसाठी पायी वारीत तल्लीन होऊन प्रवास करत असतात. कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून असंख्य वारकरी देहू आळंदी मध्ये गोळा होत आहेत. मृदुंगाची साथ, टाल चीपळांचा नादात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध होऊन ,भक्तगणांनी विठू माउली चरणी नतमस्तक होत आपल्या समाधानी जीवनाचं साकड माउलीला घातलं .

आज रोजी सौ.माधवी ताई नरेश जोशी मावळ लोकसभा निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि श्री.नरेशदादा जोशी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्तिकी एकादशी निमित्त संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर ,श्री क्षेत्र देहू येथे विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारीत जाणाऱ्या भाविक भक्तांना उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला.यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, मावळ तालुका आध्यक्ष दत्ता आण्णा पडवळ,पनवेल तालुका अध्यक्ष डॉक्टर साईनाथ डोहीफोडे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी भाविकांच्या चेहऱ्यावरील ते समाधानी भाव पाहून, भोळ्या भाबड्या वारकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन माउली चरणी आपली सेवा अर्पण केली. ताई दादांच्या समाजसेवेचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले.