⭕ कंत्राटदाराला 3 लाख 22 हजार रूपयाने गंडविले

38
⭕ कंत्राटदाराला 3 लाख 22 हजार रूपयाने गंडविले

⭕ कंत्राटदाराला 3 लाख 22 हजार रूपयाने गंडविले

⭕ कंत्राटदाराला 3 लाख 22 हजार रूपयाने गंडविले

📍सिम व्हेरिफिकेशन’च्या नावावर खात्यातून काढले गेले पैसे,
पाथरी पोलिसात गुन्हा दाखल

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

सावली : 9 डिसेंबर
‘सिम व्हेरिफिकेशन’च्या तालुक्यातील एका कंत्राटदाराला तब्बल 3 लाख 22 हजार रूपयाने गंडविल्याचा प्रकार तालुक्यातील पाथरी येथे घडला. याप्रकरणाची तक्रार पाथरी पोलिसात दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील किशोर कुनघाडकर असे कंत्राटदाराचे नाव असून, ते मुळचे नवतळा येथील रहिवासी आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून पाथरी येथे राहतात. त्यांच्या भ्रमणध्वनीवर नव्या क्रमांकावरून भ्रमणध्वनी आला. त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला असता, मुंबई येथील जिओ केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगितले. ‘‘तुमच्या भ्रमणध्वनीचे ‘सिम व्हेरिफिकेशन’ करायचे आहे. त्यासाठी तुमची सिम काही कालावधीसाठी बंद केला जाईल. त्यानंतर कंपनीकडून पुन्हा भ्रमणध्वनी येईल आणि ते सांगतील त्यानुसार तुम्ही 1 नंबर प्रेस कराल व तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक सांगाल’’, असे सांगितले. काही क्षणात पुन्हा दुसर्‍या क्रमांकावरून त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन आला. त्यांनी सांगितल्यानुसार भ्रमणध्वनीवरून एका क्रमांकाची बटण दाबताच त्यांचा भ्रमणध्वनी बंद झाला. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 3 लाख 22 हजार 934 रूपये काढल्याचा एसएमएस त्यांच्या भ्रमणध्वनीवर आला.
आपली फसगत झाल्याची बाब लक्षात येताच त्यांनी पाथरी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाथरी पोलिस करीत आहेत.
======
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी : रासकर
मोफत ऑफरला बळी पडू नका, वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे टाळा, बनावट भ्रमणध्वनीवर उत्तर देऊ नका, बनावट अँप डाउनलोड करू नका, वारंवार भ्रमणध्वनी येत असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधा, सायबर गुन्हेगारांपासून नागरिकांनी सावधगिरी बाळगत सतर्क राहावे, असे आवाहन ठाणेदार प्रमोद रासकर यांनी केले आहे.