महात्मा गांधी विद्यालयात अखंड वाचनयज्ञ कार्यक्रम संपन्न
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने दिनांक 5 डिसेंबर2025 रोजी अखंड वाचनयज्ञ उपक्रमाचे आयोजन हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या हाशिवरे येथील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष वाचन सत्राचे आयोजन करण्यात आले. अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे गेली तीन वर्षे आयोजन करण्यात येत असते. दरवर्षी या उपक्रमामध्ये 1500 हून अधिक वाचक व्यासपीठावर येऊन वाचन करीत असतात.
हाशिवरे हितवर्धक मंडळाचे सचिव अनिल मोकल यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या अखंड वाचनयज्ञ 2025 कार्यक्रमात यावर्षी प्रथमतः महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी मधील 101 हून अधिक विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन प्रत्यक्ष कथा, कविता, लेख यांचे अभिवाचन केले. सदर कार्यक्रमासाठी हाशिवरे हितवर्धक मंडळ सल्लागार सुबोध मोकल, कार्यकारिणी सदस्य निशिकांत मोकल , कवी दिलीप मोकल,हाशिवरे, हे प्रमुख पाहुणे तसेच मिलिंद मोकल हे उपस्थित होते. डॉ योगेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हाशिवरेचे प्राचार्य बी. डी. गायकवाड , पर्यवेक्षक एन. डी. प्रबळकर , यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक बी. जी शिकारे यांनी या उपक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षक आंधळे, एस .जी, श्रीमती ठाकरे ए .आर, सौ .वर्षा गुजर व सौ. चांदणी ठोंबरे, सौ.अर्चना ठाकूर उपस्थित होत्या.इयत्ता नववी ते बारावी मधील सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्व वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गामध्ये वाचनयज्ञ कार्यक्रम घेतला. वैजाळी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वाचनयज्ञ कार्यक्रम या विभागाच्या मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा म्हात्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभागामध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कवी दिलीप मोकल यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व , तसेच यापुढे मुलांनी आपल्या भावना कवितेतून व्यक्त कराव्यात असे सांगितले. कुसुमाग्रजांची एक छान कविता सादर केली.वाचन संस्कृती वाढीस लागावी या हेतूने अक्षरमंच प्रतिष्ठानचे वतीने विनामूल्य आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये वाचन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आत्मविश्वास यशाचा पाया (लेखक संकेत खर्डीकर) हे पुस्तक व सहभाग प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अखंड वाचन यज्ञ या उपक्रमासाठी बालक मंदिर संस्था, पै फ्रेंड्स लायब्ररी, रेगे दीक्षित सायन्स अकादमी, जोशी फायनान्शिअल सर्विसेस, साप्ताहिक कल्याण नागरिक, दैनिक ठाणे वैभव, खर्डीकर क्लासेस, कोकण मेवा योजक यांचे सहकार्य लाभले.अशी माहिती संस्था सचिव हेमंत नेहते यांनी दिली आहे. अध्यक्ष सुबोध मोकल यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी याविषयी मार्गदर्शन केले. सौ.प्रिया दोरवे यांनी आभार व्यक्त केले.









