booster-dose-in-india-starts
आजपासून देशात मिळणार कोरोना लसीचा बुस्टर डोस? कुठे, कोणता आणि कसा घेता येईल तुम्हाला बुस्टर डोस? पूर्ण माहितीसाठी वाचा.
booster-dose-in-india-starts
आजपासून देशात मिळणार कोरोना लसीचा बुस्टर डोस? कुठे, कोणता आणि कसा घेता येईल तुम्हाला बुस्टर डोस? पूर्ण माहितीसाठी वाचा.

सिद्धांत
१० जानेवारी २०२२: भारतामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून दिवसाला १ लाख रुग्णांचा टप्पा भारताने पार केला आहे. कोरोनाच्या नव्या व्हरीअंट ओमिक्रोनग्रस्त रुग्णाची संख्या ४ हजारापेक्षा वाढली आहे. या वाढत्या कोरोनाच्या धोक्यापासून अधिक सुरक्षा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधित लसीचा तिसरा डोस म्हणजे “बुस्टर डोस” नागरिकांना देण्याची घोषणा केली होती. त्या बुस्टर डोस देण्याच्या प्रक्रियेला आजपासून देशभरात सुरुवात होत आहे.

कोण घेऊ शकत बुस्टर डोस?
आजपासून कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या जेष्ठ नागरिकांना (६० वर्षावरील) लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मिळणार आहे.

बुस्टर डोससाठी कोणती लस मिळेल?
बुस्टर डोससाठी यादी दोन्ही लसीचे डोस पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. हे दोन डोस ज्या लसीचे घेतली असतील, त्या लसीचाच बुस्टर डोस दिला जाईल. सध्या भारतात मुख्यतः कॉव्हिडशील्ड आणि कोवॅक्सिन ह्या दोन लसी उपलब्ध आहेत.

बुस्टर डोस कुठे घेता येईल?
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या जेष्ठ नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्रामध्ये बुस्टर डोस घेता येईल. यासाठी नव्याने कोवीन अँपवर वेगळे रेजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता लागणार नाही. पहिल्या दोन डोस घेताना तयार केलेल्या अकाऊंटवरून लॉग इन करून तुम्हाला बुस्टर डोस देणाऱ्या केंद्राची यादी बघता येईल. या केंद्रात बुस्टर डोस घेतल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

बुस्टर डोस घेण्यासाठी कोणत्या प्रमाणपत्रांची आवश्यकता असेल?
बुस्टर डोस घेण्यासाठी केंद्रावर जातात तुमचे याआधी घेतलेल्या लसीच्या डोसचे प्रमाणपत्र आणि आधारकार्ड सोबत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोवीन ऍपवर लॉग इन करण्यासाठी वापरलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

बुस्टर डोससाठी पैसे दयावे लागतील का?
शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या सरकारी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस नागरिकांना मोफत उपलब्ध असेल. मात्र खासगी हॉस्पिटल आणि खासगी लसीकरण केंद्रांवर बुस्टरसाठी पैसे दयावे लागतील.

दोन डोस घेतल्यानंतर बुस्टर डोस केंव्हा घ्यावा?
ज्यांना कोरोना प्रतिबंधित लसींचे दोन डोस घेऊन नऊ महिने म्हणजे ३९ आठवडे झाले असतील, अश्या नागरिकांनाच लसीचा तिसरा डोस म्हणजे “बुस्टर डोस” घेता येणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिक यांना ३९ आठवड्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कोवीनकडून बुस्टर डोस घेण्यासाठी नोटिफिकेशन पाठवले जाईल. विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या वृद्ध व्यक्तींनी आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने बुस्टर डोस घ्यावा असे सांगण्यात आले आहे.

लसीकरण न करणे ठरू शकते तुमच्यासाठी धोकादायक.
महाराष्ट्रातील जवळपास १ कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधित लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. काही दिवसापूर्वीच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या लाटेतील मुंबईतील ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांपैकी ९६ टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधित लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. त्यामुळे लसीकरणाचे महत्त्व ओळखून नागरिकांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधित लसीकरण करून घेणे गरजेचे आहे असे शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here