बार्टी तर्फे वरोडा येथे युवा संवाद व उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा
✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधि
📲9923296442
कळमेश्वर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) च्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने वरोडा येथे युवा संवाद व उद्योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन जिल्हा उद्योग केंद्र नागपुर येथील प्रकल्प अधिकारी श्रीकांत कुलकर्णी सर तसेच त्याचे सहकारी मोनिका रामटेके व भुषण म्हस्के तसेच उद्योग प्रशिक्षक संगीता वासनिक व समतादूत तथा आयोजक प्रार्थना दिवे व कुंदा बोरकर उपस्थित होत्या याप्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेल्या श्रीकांत कुलकर्णी यांनी उद्योगविषयक शासकीय योजना तसेच कळमेश्वर येथे राबवण्यात येत असलेल्या मसाले उद्योग प्रशिक्षण विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शासकिय अनुदान योजना व लाभार्थ्यांना कसा लाभ मिळु शकतो याबाबत सुध्दा माहिती देत उद्योग आवश्यकता व महत्त्व सांगितले कार्यक्रमाला कळमेश्वर, सोनेगाव, कोहली, वरोडा येथील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते त्यांनी उद्योग व योजना सखोल माहिती घेऊन प्रशिक्षण करीता नावे नोंदणी केली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत प्रार्थना दिवे तर आभार समतादूत कुंदा बोरकर यांनी मानले.