नागभिड तालुका मधिल कोटगांव येथे आठवडी बाजाराचे उद्घाटन
*अरुणरामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड- नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे आज दिनांक ९/१/२०२१ ला आठवडी बाजाराचे धुमधडाक्यात उद्घाटन झाले. एकता ग्राम संघ कोटगांव व ग्रामपंचायत कोटगांव यांच्या संयुक्त पने हा आठवडी बाजार सुरु करण्यात आला. हा आठवडी बाजार दर रविवारला भरणार आहे. या आठवडी बाजाराचे उद्घाटन सौ.रागिणीताई गुरफुडे उपसभापती पं.स. नागभीड यांनी केले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अँड. गोविंद भेंडारकर सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचीरोली यांनी भुसविले होते. प्रमुख पाहुने म्हणून प्रफुल खापर्डे सभापती पं.स. नागभीड , खोजराम मरसकोल्हे जि.प. सदस्य चंद्रपुर , संजय गजपुरे जि.प.सदस्य चंद्रपुर , सुनिल वाघमारे सरपंच कोटगांव व सर्व सदस्य गण, आनंद मेश्राम पञकार , नत्थु सहारे तंमुस अध्यक्ष कोटगांव , नैतामे प्रकल्प अधिकारी उमेद, मोडक सर उमेद,लता घोडमारे, प्रतिक्षा बांबोळे, प्रमोद जुगनाके आदी उपस्थित होते. यावेळी उद्घाटकीय भाषणात रागीणी गुरफुडे म्हणाल्या की बचत गटामुळे महिला सक्षम होत आहेत. महीलासाठी बचतगट हे चांगले व्यासपीठ आहे. गावातील उत्पादन थेट गावातच विकत मीळेल. या उत्पनातुन बचतगट सक्षम होतील. तर अध्यक्षीय भाषणातुन अँड. गोविंद भेंडारकर बोलत होते की अनेक वर्षापासुनचे माझे स्वप्न पुर्ण झाले.मी जि.प. सदस्य असतांनी कोटगांवला बाजार भरावा अशी मनापासुन ईच्छा होती. ती ईच्छा आज एकता ग्राम संघ व ग्रामपंचायत कोटगांव यांनी पुर्ण केली.कोटगांव हे समृद्ध असे गाव आहे. शिक्षणात, कृषी क्षेञात हे गाव समृद्ध असे गाव आहे. या गावात आज पासुन बाजार भरत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचालन सौ. आरती भेंडारकर यांनी केले तर आभार नाशिका भेंडारकर यांनी केले.