गोंडपिपरी तालुक्यात पाऊस जोमात;रब्बी पिके कोमात अवकाळी पावसाने शेतकरी संकटात

52

गोंडपिपरी तालुक्यात पाऊस जोमात;रब्बी पिके कोमात

अवकाळी पावसाने शेतकरी संकटात

गोंडपिपरी तालुक्यात पाऊस जोमात;रब्बी पिके कोमात अवकाळी पावसाने शेतकरी संकटात

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-मागील आठवड्यात हवामान खात्याने १० ते १३ तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला होता.हवामान खात्याचा अंदाज खरे ठरताना दिसत आहे.काल दि .9 रविवार मध्यरात्री पासून गोंडपीपरि तालुक्यात पावसाचा कहर सुरू आहे.खरीप हंगामात कापूस,धानासह अतिवृष्टीमुळे सर्व पिकांना फटका बसला होता.खरिपात झालेली नुकसान रब्बी हंगामात भरून निघणार अशी आशा असताना तालुक्यात काल पासून जोरदार पाऊस सुरू आहे.हरबरा,मिरची,तुरी ,गहू ही पिके आता संकटात आली आहे.तुरी काढणीला आली असून काही शेतकऱ्यांची तुरी काढल्यानंतर पाण्यातच भिजत आहे.अवकाळी पावसाचा प्रत्येक शेतकऱ्यांना फटका बसत असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहनी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागनी शेतकरी करीत आहे.