जिल्ह्यात नविन निबंध लागू रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ‘नाईट कर्म्यु “शाळा, महाविद्यालय, व्यायाम शाळा, ब्यूटी पार्लर, प्रेक्षणीय स्थळे, आठवडी बाजार बंद रेस्टॉरेंट, सलून ५० टक्के क्षमतेने लग्नसमारंभात ५० व अंत्यसंस्काराकरीता २० लोकांची मर्यादा

57

जिल्ह्यात नविन निबंध लागू

रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ‘नाईट कर्म्यु

“शाळा, महाविद्यालय, व्यायाम शाळा, ब्यूटी पार्लर, प्रेक्षणीय स्थळे, आठवडी बाजार बंद

रेस्टॉरेंट, सलून ५० टक्के क्षमतेने

लग्नसमारंभात ५० व अंत्यसंस्काराकरीता २० लोकांची मर्यादा

जिल्ह्यात नविन निबंध लागू रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत 'नाईट कर्म्यु "शाळा, महाविद्यालय, व्यायाम शाळा, ब्यूटी पार्लर, प्रेक्षणीय स्थळे, आठवडी बाजार बंद रेस्टॉरेंट, सलून ५० टक्के क्षमतेने लग्नसमारंभात ५० व अंत्यसंस्काराकरीता २० लोकांची मर्यादा

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. जिल्ह्यात रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्यु लावण्यात आला आहे. दिवसा देखील ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. लग्नसमारंभ सामाजिक, धार्मिक तसेच राजकिय कार्यक्रमांना देखील जास्तीत जास्त ५० जणांना तर अंत्यसंस्काराकरीता २० जणांनाच एकत्र येता येणार आहे. शाळा, महाविद्यालय १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तर स्वीमिंग पूल, व्यायाम शाळा, ब्युटी पार्लर, तसेच प्रेक्षणीय स्थळे व आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. रेस्टॉरेंट व सलून ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. सदर निर्बंध दि.१० जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काढलेल्या आदेशात केले आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील जिल्ह्यात नविन निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद राहणार आहेत. व्यायाम शाळा, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहेत. हेअर कटींग सलून ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. ती देखील रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवावी लागतील. मनोरंजनाची स्थळे यामध्ये उद्याने, बागबगीचे, पार्कस, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे देखील बंद राहणार आहेत. शॉपिंग मॉल्स व बाजार संकुले ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत सदर दुकान बंद ठेवावी लागतील. रेस्टॉरेंट व उपहारगृह त्यांच्या ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. यामध्ये
दोन्ही लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देता येणार आहे. रेस्टॉरेंट देखील रात्री १० ते सकाळी ८ वाजतापर्यंत बंद ठेवावी लागणार आहे. होमडिलीव्हरी मात्र सुरु ठेवता येणार आहे.. नाट्यगृहे, चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. तिथे देखील दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात येईल. रात्री १० ते सकाळी ८ या काळात बंद ठेवावी लागणार आहे.
सदर निर्बंध दि.१० जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आदेश जारी केले आ