mumbai-beautification-projects
आदित्य ठाकरेंचा खास "मुंबई प्लॅन"
mumbai-beautification-projects
आदित्य ठाकरेंचा खास “मुंबई प्लॅन”

सिद्धांत
१० जानेवारी २०२२: आदित्य ठाकरे महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. हा पदभार स्वीकारल्यापासून आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्भर अनेक पर्यटन प्रकल्पाना सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांचा खास लक्ष्य मुंबई शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरु करण्यावर राहिला आहे. दक्षिण मुंबईतील हेरिटेज वॉक टूर आणि बीएमसी इमारत दर्शन सारख्या टूर त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुरु केल्या.

पर्यटनाला चालना देताना शहरातील सार्वजनिक व्यवस्था अद्यावत करणे आणि त्याद्वारे नागरिक तसेच पर्यटकांचे “इझ ऑफ लिविंग” वाढवणे हे मुंबईतील विकास कामामागचे उद्दिष्ट असल्याचे आदित्य ठाकरे मानतात. त्या अंतगर्त २०२१-२२ वर्षात मुंबईतील विकासकामे आणि सार्वजनिक जागांच्या सुशोभीकरचा खास प्लॅन त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून जाहीर केला आहे. काय आहे आदित्य ठाकरेंचा खास “मुंबई प्लॅन”.

बेस्ट बसेस मुंबईतील नागरिकांना अत्यल्प दरात शहराच्या कानाकोपऱ्यात घेऊन जातात. या बेस्टच्या शहरातील १०५ बस थांब्यांचे नूतनीकरण करण्याचा प्रकल्प ह्यावर्षी सुरु होणार आहे.

पश्चिम द्रुतगती मार्ग मेट्रो स्टेशन ते साकीनाका या अतिशय वर्दळीच्या भागात अत्याधुनिक ट्रॅफिक यंत्रणा बसवणे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा आणि मोकळ्या जगात झाडे लावून परिसरातील प्रदूषित हवेचे प्रमाण कमी करणे. या परिसरात देश -विदेशातही कंपन्यांची कार्यालये असल्याने येथे काम कर्मचाऱ्यांच्या रहदारीसाठी विस्तृत पादचारी मार्गांची निर्मिती करणे.

 

शहरातील ट्रॅफिक, टोलेगंज इमारती आणि झाडांच्या गर्दीमधून सहज दिसतील असे अत्याधुनिक आणि आकर्षक सिंग्नल यंत्रणा उभारणे. याप्रकारची यंत्रणा सध्या प्रायोगिक तत्वावर वरळीमध्ये उभारण्यात आली आहे.

मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरामध्ये नागरिकांना मोकळा वेळ घालवण्यासाठी नवीन बागा तयार करणे जवळपास अशक्य असते. हा जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईतील उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागांचा “ओपन अर्बन स्पेसेस” म्हणून विकास करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत अश्या जागांवर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण, नाना-नानी पार्क, इतर सार्वजनिक जागेंचे निर्माण केले जाणार आहे.

आधुनिक खेळ आणि व्यायामाची साधन, ट्री-हाऊस सारख्या सुविधा असलेले ५ नवे पार्क तयार करणे. तसेच शहरातील नागरिकांनी पाळलेल्या पाळीव प्राण्यांसाठी शहरांतील गार्डन्समध्ये खास जागा तयार करणे.
यासोबतच माहीम बीच सुशोभीकरण, गिरगाव चौपाटीवरील डेक, मिठी नदी शुद्धीकरण यांसारखे प्रकल्पाना ह्या वर्षात गती देण्याचे काम होणार आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईत देश- विदेशातील नागरीकांची वर्षभर रेलचेल असते. पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईचा विकास करताना अस्ताव्यस्त वाढत जाणाऱ्या मुंबई आणि उपनगरातील सामान्य मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे सुद्धा तत्परतेने लक्ष देणे गरजेचे आहे, याचे भान प्रशासनाने राखणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here