महिला मजुरांच्या अपघाती मृत्युला जबाबदार असणाऱ्या रेल्वे कर्मचारी व ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी.
✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधि
📲9923296442
नागपुर:- कंत्राटदार रविंद्रसिंग व रेल्वे मजूर मुकादम यांच्या हलगर्जीपणामुळे दोन गरीब महिलांना आपला जीव गमावावा लागला असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. त्यामूळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दोन महिला मजुरांच्या अपघात होऊन निधन झाले. महिलांचे कटलेले शरीराचे तुकडे दोन तास पटरीवर पडून राहिले. त्याकडे कुणी बघितले नाही. या अपघाताची जाबबदारी कंत्राटदार व रेल्वे प्रशासन होती ते या महिलांच्या मृत्युची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ दाखवत होते. शेवटी वंचित बहुजन आघाडीने काटोल यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात केले तिव्र आंदोलन करण्यात आले तेव्हा प्रशासनाला जाग आली.
कंत्राटदार रविंद्रसिंग व रेल्वे अधिकारी व काटोल पोलीस अधिकारी व परिवार व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे यांच्या चर्चेनूसार मृतक महिलेच्या परिवाराला दिड लाख रुपये म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार असे ठरले. रेल्वे प्रशासनाची मदतीची हमी दिल्यानंतर मृत्युदेह स्वीकारून त्यांचा मुळ गावात परीवाराने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.