नायलॉन मांजाच्या विरोधात पोलीस प्रशासन सक्रीय; जनतेचे सुध्दा सहकार्य आवश्यक      

रमेश कृष्णराव लांजेवार 

मो: 9921690779

नागपूर:पोलिसांची सक्त कारवाई आणि निरअपराध लोकांचा जाणारा जीव किंवा दुर्घटना हे डोळ्यांनी दिसत असुन सुद्धा नायलॉन मांजा विक्रेता व खरेदीदारांना समज आलेला नाही ही दुर्दैवाची बाब आहे.मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या विक्री व खरेदीवर बंदी आहे. तरीही नायलॉन मांजाची विक्री सर्रास सुरू असल्याचे दिसून येते. नागपूरात सर्वाधिक नायलॉन मांजाची आवक उत्तर प्रदेशच्या बरेली आणि गुजरातच्या वडोदरा येथून होत असल्याचे सांगितले जाते.नायलॉन मांजराच्या विरोधात पोलीस कारवाई होण्याच्या अगोदर व्यापाऱ्यांनी 60 ते 70 टक्के  नायलॉन मांजाची विक्री केल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे नायलॉन मांजाला रोखण्यासाठी सर्वसामान्यांनी पोलिसांना सहकार्य करने अत्यंत गरजेचे आहे.यावरून स्पष्ट होते की नायलॉन मांजाचा धोका अजून पर्यंत समाप्त झालेला नाही. त्यामुळे नायलॉन मांजावर बंदी असुन सुद्धा विक्री सर्रास सुरू आहे याला आपणच रोखु शकतो.नायलॉन मांजा मानव आणि पशु-पक्षांसाठी जीवघेना व घातक आहे त्यामुळे नायलॉन मांजाचा “बहिष्कार” सर्वच स्तरातून होने अत्यंत गरजेचे आहे.कारण नायलॉन मांजाच्या विरोधात प्रशासनाने कंबर कसली आहे.त्याच धर्तीवर सर्वसामान्यांनी नायलॉन मांजाच्या विरोधात ऍक्शन मोडमध्ये येण्याची नितांत गरज आहे.संक्रांत म्हटली की पतंग आलीच पतंगी शिवाय संक्रांत अधुरी असल्याचे लहान मोठ्याना वाटत असते. परंतु काही नागरिक व मुलं यांनी जर चुकीचा मार्ग अवलंवीला किंवा निष्काळजीपणा केला तर मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होते याला नाकारता येत नाही.नायलॉन मांजाच्या बंदीबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संघटना, संस्था व जनता आवाज उचलत आहे आणि गेल्या 10 वर्षात अनेक दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जिवीत हानीसुध्दा झाल्याचे सर्वांनाच ग्यात आहे.मागील वर्षी नायलॉन मांजामुळे नागपुरमध्ये 300 हुन अधिक मानवी दुर्घटना झाल्यात व पशुपक्षांच्या 600 हुन अधिक दुर्घटना झाल्याचे निदर्शनास आले.त्याचप्रमाणे मागीलवर्षी गुजरातमध्ये पतंगबाजीमध्ये 800 हुन अधिक मानवी दुर्घटना झाल्यात यात छतावरून पडुन 100 हुन अधिक घायल झालेत व 10 जनांचा मांजाने गळा कापुन मृत्यू झाला अशा भयानक घटना नायलॉन मांजामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत.दिनांक 5 जानेवारी 2021 ला  अंगावर शहारे येणारी घटना कोराडी परीसरात घडली पतंग पकडतांना रेल्वेखाली कटुन 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.म्हणजेच पतंगीच्या नादात जीवीत हाणी केव्हाही ओढावु शकते.त्यामुळे सावधगिरीचे उपाय म्हणून घरातील परिवाराने डोळ्यात तेल घालून मुलांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे.कोणत्याही दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता “नायलॉन मांजाचा सर्वच स्तरातून बहिष्कार” होने अत्यंत आवश्यक आहे.कारण भारतात नायलॉन मांजामुळे मानवी व पशुपक्षांच्या हजारो दुर्घटना दरवर्षी होत असतात.एखाद्या विजेच्या ताराला जर पतंग अडकली तर विजेचे तार एकमेकांवर आदळतात व त्याचा स्पार्क होतो अशा वेळेस पतंग उडविणाऱ्याला कदाचित आपला प्राणसुध्दा गमवावा लागतो.त्यामुळे मी सर्व पतंग शौकीनांना विनंती करेल की नायलॉन मांजाला “टाटा बाय बाय”करून कॉटनच्या धाग्यानेच पतंग उडविला पाहिजे.कारण अनेक पशु-पक्षांनासुध्दा नायलॉन मांजामुळे आपले प्राण गमवावे लागतात. पक्षांचा विचार केला तर त्यांची परीस्थिती अत्यंत गंभीर, भयावह व बिकट आहे.कारण आज वाढत्या प्रदूषणामुळे त्यांचे जगने अत्यंत कठीण झाले आहे.पक्षांना हवेत जास्त वेळ रहावे लागते.त्यामुळे त्यांना प्रदुषणाचा व आता नायलॉन मांजाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. संक्रांतीच्या शुभपर्वावर नायलॉन मांजामुळे मानवी व पक्षांची जिवीत हानी होणार नाही याची काळजी व जबाबदारी सर्वसामान्यांनी स्वीकारली पाहिजे.पोलिस विभाग याबाबत सतर्कता बाळगुन लाखो रुपयांचा नायलॉन मांजा रोज जप्त करीत आहे.नायलॉन मांजा हा मांजा नसुन “जहरीली तलवार”आहे. कारण आपला किंवा पक्षांचा गळा “कळत न कळत” केंव्हाही कापु शकते ही बाब सर्वांनीच

लक्षात ठेवली पाहिजे. मागील वर्षी आणि आताही अनेकांचा  मांजराने गळा कापल्या गेला यात ते गंभीर जख्मीसुध्दा  झालेत.त्यामुळे पतंग उडविताना सावधगिरीने पतंग उडवावी.पतंग उडवा परंतु जीवाशी खेळु नका यातच सर्वांचे हित आहे. कारण एक छोटीशी चूक मोठा हादसा घडवु शकते याला नाकारता येत नाही.संक्रांतीचा आनंद भरपूर घ्या! परंतु जिवावर बितण्यालायक कोणतेही कृत्य होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.यातच सर्वांचा आनंद आहे.कायदा व पोलीस विभाग आपले काम चोख बजावीत आहे.परंतु आपणच तटस्थ रहालो तर नायलॉन मांजावर मात अवश्य करू शकतो. सध्याच्या अत्याधुनिक युगात नायलॉन मांजाची विक्री ऑनलाईनेसुध्दा होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे त्यामुळे प्रशासन यावर योग्य कारवाई करीतच आहे.अशा कठीण परीस्थितीत नायलॉन मांजाला रोखण्यासाठी प्रशासनापेक्षा समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. तेव्हाच नायलॉन मांजा हद्दपार होवु शकतो.पालकांनी आतापासूनच आपल्या मुलांना नायलॉन मांजा पासुन दुर ठेवण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करावा व नायलॉन मांजराचे दुष्परिणाम समजून सांगावे. सरकार व पोलीस विभाग यावर लक्ष ठेवुन आहे.परंतु नागरिकांचेसुध्दा कर्तव्य आहे की जी वस्तु “घातक आणि जिवघेनी”आहे आणि ती आपण रोखु शकतो ती रोखलीच पाहिजे.”यामुळे अपघातावर आळा बसेल व पशुपक्षांचे प्राण वाचतील” पतंगीचा आनंद भरपूर घ्या. परंतु  नायलॉन मांजाला “हद्दपार”करण्यासाठी विक्रेते,ग्राहक व नागरिकांनी पुढाकार घ्यावा.कारण नायलॉन मांजा हे आपल्यासाठी “जहरच”आहे.नायलॉन मांजामुळे होणारे अपघात सांगुन येत नाही ते केंव्हाही कधीही होवु शकतात.आपण अनेक कठीणाईचा सामना करू शकतो मग नायलॉन मांजाला “हद्दपार”का करू शकत नाही?मानवाने मनात ठानले तर सर्वकाही होवु शकते. सावधगिरीचे उपाय म्हणुन मी सांगू इच्छितो की मुलांनी कटलेल्या पतंगीच्या मागे धावु नये,वाहनचालकांनी कटलेल्या पतंगीच्या धाग्यापासुन  सावधानी बाळगावी.”सर्व अपघात टाळा व प्राणीमात्रांचे प्राण वाचवा”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here