बस उसळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अंगणवाडी मदतनीसाचा मृत्यू मासळ येथे मदतनीस म्हणून होत्या कार्यरत,

55
बस उसळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अंगणवाडी मदतनीसाचा मृत्यू मासळ येथे मदतनीस म्हणून होत्या कार्यरत,

बस उसळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अंगणवाडी मदतनीसाचा मृत्यू

मासळ येथे मदतनीस म्हणून होत्या कार्यरत,

बस उसळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अंगणवाडी मदतनीसाचा मृत्यू मासळ येथे मदतनीस म्हणून होत्या कार्यरत,

✍️ भवन लिल्हारे भंडारा जिल्हा प्रतिनिधी 📱मो.नं.9373472847📞

भंडारा : जिल्ह्यातील भंडारा पवनी मार्गावरील श्रीनगर येथे बस उसळल्याने अंगणवाडी मदतनीसाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सविस्तर असे की, अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या आंदोलनानंतर एस.टी.ने परत जात असताना काही कारणामुळे एस.टी. बस उसळली. त्यात अंगणवाडी मदतनीसाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. कमल विजय गोंधळे ( वय ४७ वर्षे रा. मासळ ) असे मृत झालेल्या अंगणवाडी मदतनीसचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास भंडारा- पवनी मार्गावरील श्रीनगर येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे गत ३५ दिवसापासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू आहे. सोमवारी दुपारी ३.३० वाजता आंदोलन आटोपल्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस आपापल्या गावाकडे परत निघाल्या. त्यात कमल गोंधळे यांचाही सहभाग होता. त्यात ते आपल्या स्वगावी मासळ येथे जाण्यासाठी त्यांनी एस.टी. क्रमांक एम.एस. ४० एक्यू ६२५६ बस पकडली. यावेळी त्यांच्यासोबतच्या अन्य कर्मचारीही उपस्थित होते. बस पहिला गावा नजीकच्या श्रीनगर येथे पोहोचताच अचानक एस.टी. बस जोरात उसळली. त्यात कमल गोंधळे यांच्या डोक्याला गंभीर दुःखापत होऊन मार लागला. बस चालकाने त्वरित बस प्राथमिक आरोग्य केंद्र पहिला येथे उपचाराकरिता नेली. प्राथमिक उपचार झाले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने गोंधळे यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरने त्यांना तपासून मृत घोषित केले.

या घटनेने अंगणवाडी मदतनीस व सेविकांमध्ये एकच खळबळ उडाली. कमल गोंधळे यांच्या मागे पती, तीन मुली, एक मुलगा असे आप्त परिवार आहे. सविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. या घटनेला राज्य शासन जबाबदार आहे असे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा आरोप आहे. गत ३५ दिवसापासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे त्यांच्या न्यायोचित मागण्यासाठी उपसण सुरु आहे. मात्र राज्य शासनाने याची दखल घेतलीच नाही. या आंदोलनाची दखल घेतली असती तर, कदाचित कमल गोंधळे यांना त्यांच्या जीवाला मुकावे लागले नसते. असे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे म्हणणे आहे.