प्राचार्य डी जी खडसे यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार
✍🏻 मनोज गोरे✍🏻
चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
मोबाईल : 9923358970
कोरपना – ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना चे प्राचार्य डी जी खडसे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्य त्यांच्या सेवा कार्याबद्दल सेवापूर्ती सत्कार सपत्नीक व कुटुंबीयांसह
करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे , प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचें , सिताराम कोडापे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी कोवे , ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाऊराव कारेकर, कोषाध्यक्ष पाशा पटेल, सहसचिव प्रा.अरुण कुकडे, ज्येष्ठ संचालक नामदेवराव जोगी, संचालक गणेश गोडे,सुभाष जोगी , विलास बोरडे, अरविंद कारेकर,राजेश्वर जुमनाके,कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुटबन चे माजी उपसभापती पुंडलिक ठाकरे, वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी बी बोंडे , पर्यवेक्षक के डी घुगुल , रहेमान भाई,सेवानिवृत्त शिक्षक नारायण हजारे , एस व्हि बावणे , उईके, गायधने ,
प्रा ज्योती येरावार, त्यांच्या सहचारिणी संगीता खडसे , मुलगा यश खडसे , मुलगी प्रणाली खडसे, पत्रकार मनोज गोरे , जयंत जेनेकर आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थाध्यक्ष श्रीधरराव गोडे ,विजयराव बावणे , उत्तमराव पेचे, सिताराम कोडापे,संभाजी कोवे , प्राचार्य बोंडे , त्यांचे सासरे बाजार समितीचे उपसभापती पुंडलिक ठाकरे, प्रा.अरुण कुकडे
मुलगा यश खडसे , मुलगी प्रणाली खडसे यांनी खडसे सर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी बी बोंडे, संचालन गणेश गोडे तर आभार मने सर यांनी मानले.