माणगांव मध्ये मुक्या प्राण्यांचा व गोरगरीबांचा देव माणूस. दिवसाला एक हजार चपातीचे होते मोफत वाटप

74
माणगांव मध्ये मुक्या प्राण्यांचा व गोरगरीबांचा देव माणूस. दिवसाला एक हजार चपातीचे होते मोफत वाटप

माणगांव मध्ये मुक्या प्राण्यांचा व गोरगरीबांचा देव माणूस.
दिवसाला एक हजार चपातीचे होते मोफत वाटप

माणगांव मध्ये मुक्या प्राण्यांचा व गोरगरीबांचा देव माणूस. दिवसाला एक हजार चपातीचे होते मोफत वाटप

✒️नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048

माणगाव : माणगांव तालुक्यातील श्रीवर्धन मोर्बा रोड लगत निळगून या ठिकाणी बिट्टू फार्म असून या फार्म हाऊसचे मालक प्रकाश जैन यांच्या माध्यमातून गेली पाच ते सहा महिन्या पासून गोरगरीब शेतकऱ्यांसाठी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम हे राबविले जातअसून प्रकाश जैन यांनी तर या पुढे जाऊन आपल्या परिसरातील मुके प्राणी तसेच गोरगरीब उपाशीपोटी राहू नये म्हणून त्यांच्या साठी सकाळी तसेच संध्याकाळी चपाती ही मुक्या प्राण्यांना तसेच गोरगरीब गरजू नागरीकांना दिली जात आहे.जैन यांनीआपल्या या जागे मध्ये रोज चपाती मुक्या प्राण्यांना व गोरगरीबांना मिळावी यासाठी त्यांनी लाखो रूपये किमतीची चपाती भाजण्याची विजेवरील मशीन त्यांनी बसवली आहे.तसेच त्या मशीन मधून काही मिनिटांत पाच किलो पिठातून तीनशे चपात्या सकाळी व दुपारी संध्याकाळी काढल्या जातात.या चपात्या गाय बैल, म्हशी, भटके कुत्रे, मांजर यांना मोठ्या प्रेमाने भरविल्या जातात तसेच याच ठिकाणी बाजूला मुक्या प्राण्यांना पाणी पिण्यासाठी सिमेंटची टाकी देखील बांधली आहे.

तसेच यावेळी या मोर्बा श्रीवर्धन रस्त्याच्या मार्गाने व या परिसरातील गोरगरीब गरजू नागरिक,मजूर व काही आदिवासी बांधव लहान मुले हे जाता असतात यांना सुद्धा या ठिकाणी चपाती दिली जाते तसेच या परिसरातील काही गोरगरीब नागरिक हे सकाळ व संध्याकाळ च्या वेळेत चपाती साठी येत असल्याचे देखील माहिती यावेळी येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रतिनिधी जवळ दिली.प्रकाश जैन यांच्या माध्यमातून पाणपोईची सुद्धा व्यवस्था ही मोर्बा श्रीवर्धन रोड लगत केली असल्याने या पाणपोईचा अनेक लोकांना तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या शाळेतील शैक्षणिक सहलीच्या विद्यार्थ्यांना या पिण्याच्या पाण्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. त्यामुळे या परिसरातील जनता प्रकाश जैन यांना मुक्या प्राण्याचा व गोरगरीबांचा देव म्हणून संबोधतात.
मागील ऑगस्ट महिन्यापासून चपाती वाटप करण्याच काम अभय पार्शवमणी ट्रस्टचे प्रमुख प्रकाश जैन यांच्या द्वारे होत असून त्यांना उमर सोलकर, बळवंतसिंह राजपूत, मोहन प्रजापती, निलेश गुगले, दीपा गुगले यांचे चांगले सहकार्य मिळताना दिसत आहे.