नार्वेकरांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंचा व्हीप नाकारला, एकनाथ शिंदेना काढण्याचा हक्क उद्धव ठाकरेंना नाही
मुंबई: एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. सुनील प्रभूंचा व्हीपच लागू होत नसल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी योग्य ठरवता येणार नाही, असं नार्वेकरांनी म्हटलं. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशही विसंगती करणारा असल्याने, सर्वसामान्य नागरिकांमध्ये या निकालाबाबत नाराजी दिसत आहे.
काय दिला आहे नार्वेकरांनी दिलेला निकाल:
– शिंदे गटच मूळ शिवसेना, शिंदेंना हटवण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही
– पण याचवेळी शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे गट यापैकी कुणाचेच आमदार अपात्र नाहीत
– २१ जून २०२२ नंतर भारत गोगावलेच प्रतोद, सुनील प्रभूंची नियुक्ती रद्द
– पक्षाच्या प्रमुखांची उच्च म्हणजे, पक्षाची इच्छा नाही
– शिंदे गटाची भाजपशी मिलीभगत होती या आरोपाचा पुरावा मिळाला नाही
– शिंदे गटांनी पक्षशिस्त मोडली नाही, बैठकीला ना येणं हकालपट्टीचे कारण ठरू शकत नाही
– ठाकरेंचा व्हीप शिंदे गटाला मिळाला याचा पुरावा नाही
– २०१८ सालची शिवसेना नेतृत्व रचना पक्षघटनेच्या आधारे पक्ष ठरवता येत नाही.
नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश फेटाळला
या निर्णयातून असं दिसून येते कि, नार्वेकरांनी कोणत्याही गटाला अपात्र ठरवले नाही. मात्र एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे नेते म्हणून मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने, निर्णय देताना शिवसेनेची २०१८ सालाची पक्ष घटना ग्राह्य धरा. तसेच शिंदे गटाकडून प्रतोदपदी भरत गोगावले यांची नेमणूक बेकायदेशीर ठरवली होती. मात्र अध्यक्ष नार्वेकर यांनी न्यायालयाच्या या दोन्ही आदेशांच्या विरोधात जाऊन आपले निर्णय दिल्याने त्याबाबत मोठी शंका उत्पन्न केली जात आहे. शरद पवार, काँगेसचे नेते तसेच सोशल मीडियावरून सर्वसामान्य जनतेकडून शिवसेना हि ठाकरेंचीच असा मत मांडलं जात आहे. त्याचवेळी भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्यामार्फत दबाव तंत्राचा वापर करत न्यायालये, कायद्यांचा अपमान करत असल्याचे बोलले जात आहे.