Gadkari inaugurates Mahatma Gandhi Rural Industrialization Center at Imgiri
Gadkari inaugurates Mahatma Gandhi Rural Industrialization Center at Imgiri

गडकरी यांच्याहस्ते एमगिरीत महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान केंद्राचे लोकार्पण.

Gadkari inaugurates Mahatma Gandhi Rural Industrialization Center at Imgiri
Gadkari inaugurates Mahatma Gandhi Rural Industrialization Center at Imgiri

आशीष अंबादे प्रतिनिधी
वर्धा:- महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथील जैव प्रसंस्कररण आणि जडी-बुटी विभागामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या एस्पायर योजनेंतर्गत ‘लाइवलीहुड बिजनेस इनक्यूबेटर केंद्राचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी 6 रोजी लोकार्पण केले. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, एमगिरीच्या कार्यकारी संचालक प्रिता वर्मा उपस्थित होते. जैव प्रसंस्कारण आणि जडी-बुटी विभागाचे उपसंचालक डॉ. कर्मराज यादव यांनी त्यां ना एल.बी.आय.केंद्रांतर्गत फळे आणि भाजीपाल्यावर करण्यात येणार्‍या प्रक्रीया यंत्रांची माहिती दिली. भविष्यात पंचगव्य, हर्बल, कृषी संबंधी यंत्रे लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
ना. गडकरी यांना महात्मा गांधी औद्योगिकीकरणातर्फे विकसित यंत्रांबाबत तांत्रिक माहिती उपसंचालक रवी कुमार यांनी दिली. यावेळी गडकरी यांनी एका प्रशिक्षण केंद्राचेही उद्घाटन केले. ना. गडकरी यांनी गांधीजींच्या स्थानिक स्तरावर उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा स्थानिकस्तरावरच प्रक्रीया करण्याच्या तत्त्वाची ग्रामीण भागाच्या विकासाकरिता आवश्यकता असल्याचे सांगितले. एमगिरी द्वारा विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची त्यांनी प्रशंसा केली आणि या संस्थानाला नवीन जमीन उपलब्धत करून आंतरराष्ट्रीयस्तरावर विकसित करण्याचे आवाहन केले.

प्रत्येक विषयावर स्वातंत्र विभाग आणि प्रयोगशाळा असावी, ग्रामीण क्षेत्रासाठी, वनवासी, आदिवासी, युवावर्ग, शेतकरी आणि महिला सशक्तिकरणाकरिता प्रभावी अंमलबजावणी करता येईल. जयपूरच्या खादी संस्थान द्वारा विकसित गोबर पेंट फैक्टरी स्थापन करण्याचे आवाहन केले. त्यामुळे गायीच्या शेणाला एका किलोला 5 रुपये भाव मिळू शकेल, असे सांगितले. यावेळी एमगिरीचे नवनियुक्त सदस्य माधव कोटस्थाने, किरण पातुरकर, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिप अध्यक्ष सरिता गाखरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here