Republican Social Organization Maharashtra, Mahamata Ramabai Ambedkar's 123rd birth anniversary "Mahamata Ramaichi Lake" 2021 award ceremony held.
Republican Social Organization Maharashtra, Mahamata Ramabai Ambedkar's 123rd birth anniversary "Mahamata Ramaichi Lake" 2021 award ceremony held.

रिपब्लिकन सामाजिक संस्था महाराष्ट्र, महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या 123 व्या जयंती प्रित्यर्थ “महामाता रमाईची लेक” 2021 पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न.

Republican Social Organization Maharashtra, Mahamata Ramabai Ambedkar's 123rd birth anniversary "Mahamata Ramaichi Lake" 2021 award ceremony held.
Republican Social Organization Maharashtra, Mahamata Ramabai Ambedkar’s 123rd birth anniversary “Mahamata Ramaichi Lake” 2021 award ceremony held.

गुणवंत कांबळे – प्रतिनिधी

मुंबई:- कोकणस्थ जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था महाराष्ट्र आयोजित महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या 123 व्या जयंती प्रित्यर्थ सामाजातील उत्कृष्ट सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या पाच भगिनींना “महामाता रमाईची लेक”-2021 गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी भीमछाया सांस्कृतिक केंद्र, कपिलवस्तु बुध्द विहार, कालिना, सांताक्रुझ पूर्व मुंबई येथे कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्यावतीने प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

दिपीका दिपक चिपळूणकर (सामाजिक), मधुबाला रविंद्र इंदवे (शिक्षण), वनिता गोविंद जाधव (आरोग्य व धार्मिक), सुप्रिया मिलिंद मोहिते (धार्मिक व शैक्षणिक), ऍड.अभया घनश्याम सोनावणे (महिला कायदे विषयक सल्लागार-नोटरी) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानित करताना प्रमुख पाहुणे ना.डॉ.रामदासजी आठवले साहेब (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री भारत सरकार) यांचा हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच विशेष कार्यक्रम भीमछाया सांस्कृतिक केंद्र मुंबई बौध्दजन पंचायत समिती गट क्रमांक 22-23 व सांताक्रुझ (पूर्व) विभागातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने कैलाशचंद्र आव्हाड साहेब (सहाय्यक पोलीस आयुक्त) यांचा सत्कार करण्यात आला.

Republican Social Organization Maharashtra, Mahamata Ramabai Ambedkar's 123rd birth anniversary "Mahamata Ramaichi Lake" 2021 award ceremony held.
विशेष उपस्थिती प्रमुख वक्ते बबन कांबळे साहेब (जेष्ठ पत्रकार, अभ्यासक, संपादक-वृत्तपत्र सम्राट ), दिनेश रा.डिंगळे (सहसचिव सामाजिक न्याय खाते महाराष्ट्र शासन ), गौतम सोनवणे (अध्यक्ष रिपाई मुंबई), किशोर रा.मोरे (कार्याध्यक्ष बौ.पं.समिती), लक्ष्मण रा.भगत (मुख्य सचिव,बौ.पं.समिती), दिपक सोनावणे, कृष्णा गायकवाड, सिद्धार्थ कांबळे, अरुण पवार (संस्थापक भि.सां.के.), कृष्णा गायकवाड, विजय वाघमारे (नेते पी आर पी ), रमेश पाटील, नागसेन कांबळे (सरचिटणीस- डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समिती), संजय कापसे (मा.गट प्रतिनिधी), कृतिका किशोर जाधव (समाज सेविका), संगीता रविंद्र सोनावणे (समाज सेविका) तसेच आपले विनीत प्रकाश मोरे (अध्यक्ष), संघराज तांबे (उपाध्यक्ष), चांद्रकिरण सकपाळ (कार्याध्यक्ष), सदानंद मोहिते (सचिव), अनिल जाधव (उपसचिव), बाबनभाई राजापकर (कोषाध्यक्ष), सुनिताताई गायकवाड (अध्यक्ष-म.आ.महाराष्ट्र) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

गुणवंत कांबळे – प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here