वर्ध्या जिल्हात विदर्भ पटवारी संघाचे काळ्या फिेती लावुन मूक आंदोलन.


आशीष अंबादे प्रतिनिधी

वर्धा:- समुद्रपूर-हिंगणघाट उपविभागात ऑक्टोबर 20 पासून वेतनच न मिळाल्याने तलाठी संवर्गाची व त्यांच्या कुटुंबियांची उपसमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. 27-28 जानेवारी रोजी काळ्या फिती लावून काम करीत प्रशासनाचा निषेध केला. परंतु, अजुनपर्यंतसुद्धा प्रशासनाने तलाठी संवर्गाची दखल न घेतल्याने आज 8 रोजी पुन्हा उपविभागीय कार्यालयापुढे विदर्भ पटवारी संघाच्या जिल्हा शाखेने जिल्ह्यात सर्वत्र काळ्या फिती लावून प्रशासनाचे निषेधार्थ मूक निदर्शने केली. यात आर्वी उपविभागातून 65, वर्धा उपविभागातून 85 तर हिंगणघाट उपविभागातून 87 असे 237 तलाठी या आंदोलनात सहभागी झाले होते.

कोरोनाच्या फटक्याने शासनाकडन निधी प्राप्त होत नसल्याने सद्या ही परिस्थिति निर्माण झाल्याचे कारण प्रशासन जरी सांगत आहेत. कोरोनाकाळात आरोग्य कर्मचारी, पोलिस, शिक्षक तसेच तलाठी महत्त्वाचे कोरोना योद्धे ठरले असले तरी यातील तलाठी संवर्गाची आर्थिक संकटाने ससेहोलपट होत आहे. दिवाळीपासून या संवर्गाचे मागणी करुनसुद्धा शासन दुर्लक्ष करीत असल्याने विदर्भ पटवारी संघाचे वर्धा जिल्हा शाखेने इशारा देण्याच्या दृष्टीने पूर्वसुचनेनुसार काळ्या फिती लावून प्रशासनाचा लक्षवेधण्याचा प्रयत्न केला. प्रलंबित वेतन व इतर लाभ मिळावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांना पाच टप्प्यात आंदोलनाची नोटिससुद्धा जिल्हा पटवारी संघाच्या वतीने 21 जानेवारी रोजी देण्यात आली आहे.

महसुल विभागातील तलाठी संवर्ग वगळता लिपिक तसेच महसुल अधिकारी यांचे वेतन नियमित होत असून त्यांचे वेतन, सण अग्रीम, वेतन थकबाकी आदी सर्व लाभ मिळत असून या संवर्गावरच वेतनावीना काम करण्याची पाळी आली आहे. वेतन व इतर प्रलंबित लाभ मिळविण्यासाठी आता 3 टप्प्यात आंदोलनाची करण्यात येणार आहे. आज केलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास 15 रोजी कामकाज करण्यासाठी असलेले डोंगलसुद्धा तालुका अधिकार्‍यांकडे जमा करतील. 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारासुद्धा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हाध्यक्ष अशोक आंबेकर, उपाध्यक्ष संजय कपूर, सचिव श्याम चंदनखेडे, आशिष गोसावी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. हिंगणघाट येथे तलाठी संघटनेचे सदस्य विलास राऊत, संजय भोंग, अरुण सुरजुसे, स्मीता चाफले, आसमा शेख, प्रीती माहुरे, रेखा घोडमारे आदी सहभागी झाले होते. वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनात ओ. पी. सातपुते, एस. डी. भट, जे. एम. बुरांडे, व्ही. आर. झाडे, देवेंद्र नेहारे, डि. एन. चौधरी, एस. एम. तिनघसे, आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here