पट्टेदार वाघाचा चालत्या दुचाकी वर हमलाः सुरज थोडक्यात बचावला
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभीड: -तालुक्यातील कोटगांव येथील सुरज रंधये वय २८ वर्षे हा वाघाच्या हमल्यातुन थोडक्यात बचावला. आज दिनांक १०/२/ २०२२ वहीनीला पानोळी येथे नेवुन दिले. परतीला बालापुर मार्ग म्हसलीला निघायचे होते. या दरम्यान कच्चा रोड असल्याने वाहन हळु येत होते. दबा धरुन बसलेल्या वाघाने गाडीचालकावर झडप टाकली. माञ वाघाची झडप मागील शिटच्या भागावर पडल्याने शीट फाटली. माञ सुरज गाडी घेऊन खाली पडला. गाडी सुरुच होती.
वाघ थांबलेला होता. माञ सुरजने हींमत दाखवुन गाडीवर बसुन बालापुर मौशी मार्ग कोटगावला आला. घरी आल्या आल्याच त्याला भोवळ आली. तो घाबरलेला होता. त्याच शरीर थरथर कापत होते.काही वेळाने तो उठुन बसला आणी घडलेला प्रकार सांगितला. गाडी घेऊन पडल्याने पायाला लागले आहे. माञ नशिब बलवत्तर म्हणून सुरजचे प्राण वाचले.