चैत्यभूमी अशोक स्तंभा शेजारी “भव्य राष्ट्रध्वज” शासनाच्या वतीने उभारण्या यावा भारतीय लोकसत्ताक संघटनेची मागणी

56

*चैत्यभूमी अशोक स्तंभा शेजारी “भव्य राष्ट्रध्वज” शासनाच्या वतीने उभारण्या यावा

भारतीय लोकसत्ताक संघटनेची मागणी

चैत्यभूमी अशोक स्तंभा शेजारी "भव्य राष्ट्रध्वज" शासनाच्या वतीने उभारण्या यावा भारतीय लोकसत्ताक संघटनेची मागणी

गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई- भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर मा.किशोरताई पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष मा.यशवंत जाधव साहेब यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यलायात दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी भेट घेतली आणि संघटनेच्या माध्यमातून पुढील विषयाबाबत निवेदन देण्यात आले (१)चैत्यभूमी अशोक स्तंभा शेजारी भव्य असा राष्ट्रध्वज शासनाच्या वतीने ऊभारण्यात यावा.
(२)बृहन्मुबई महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभाग मध्ये “मुंबई पब्लिक स्कूल”च्या धर्तीवर एक समान दर्जाच्या व मोफत असणाऱ्या शाळा सुरु करण्याबाबत.
(३)बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात बेरोजगारांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी फेरीवाला हॉकर्स (street Vendors) “स्टॉलचे लायन्सस” देण्यात यावेत.

सदर मुद्देविषयी भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या वतीने बृहन्मुबई म.न.पा.महापौर मा. किशोरीताई पेडणेकर स्थायी समिती अध्यक्ष मा. यशवंत जाधव साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले व संवाद साधण्यात आला. मुंबईत आजुन अधिकच्या शाळा सुरू करू , तसेच सर्व विषयाच्या अंमलजावणीचे आश्वासन महापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांनी दिले.

अमोलकुमार बोधिराज, सनी कांबळे, मनिष जाधव, मंगेश खरात, सुप्रिया मोहिते,नितीन सातपुते,सुशांत जाधव, अभिषेक कासे, वैशाली कदम, पिलाजी कांबळे,आनंद नवतूरे,योगेश कांबळे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.