गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी ते अहेरी महामार्गात ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी स्थिती ! रस्ते धोकादायक ; ग्रामस्थामधून व्यक्त केला जातोय संताप चौडंपल्ली ते आलापल्ली मार्गावरील वाहतूकदारांचा जीव धोक्यात

64

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी ते अहेरी महामार्गात ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी स्थिती !

रस्ते धोकादायक ; ग्रामस्थामधून व्यक्त केला जातोय संताप

चौडंपल्ली ते आलापल्ली मार्गावरील वाहतूकदारांचा जीव धोक्यात

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी ते अहेरी महामार्गात 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता' अशी स्थिती ! रस्ते धोकादायक ; ग्रामस्थामधून व्यक्त केला जातोय संताप चौडंपल्ली ते आलापल्ली मार्गावरील वाहतूकदारांचा जीव धोक्यात

राजेंद्र झाडे, प्रतिनिधी
मो नं 9518368177

गडचिरोली :-समाजातील समस्या कमी की काय असे वाटत असताना माय बाप सरकार जनतेसाठी काही तरी करेल का? याची वाट बघितली जात आहे.नक्षल ग्रस्त आणि सुख सुविधेपासून वंचित आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मार्गाची अवस्था पाहिल्यावर ‘रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता’हेच समजून येत नाही.अनेक रस्ते धोकादायक स्थितीत असून दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे.याला कारणीभूत कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोंडपिपरी ते अहेरी या महा मार्गावरून येत असताना गोंडपिपरी तालुक्यातील विट्ठलवाडा या गावाची सीमा समाप्त झाल्या नंतर जीव घेण्या रस्त्यांचा सामना करावा लागतो.चौडंपल्ली ते अहेरी मार्गात मोठ मोठे खड्डे पडले असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला अडचणीची ठरत असून अपघाताला कारणीभूत ठरत आहेत आष्टी ते अहेरी पर्यंत चा प्रवास करणे म्हणजे जीव वेठीस घालने असे म्हणायला हरकत नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पासून अहेरी पर्यंतचा संपूर्ण रस्ता मोडकळीस आला असून रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत.प्रवास करताना ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ काही समजत नाही.जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील रस्त्यांची अवस्था बिकट आहे.अनेक रस्ते धोकादायक स्थितीत असून दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.गोंडपिपरी शहरातुन आष्टी मार्गे अहेरी कडे जाणारा मुख्य मार्गा बरोबरच असे किती तरी गावातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.रस्त्याची परिस्थिती पाहता वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहे.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक जण अपंग झाले तर काहीजण मृत्यूमुखींही पडले असल्याचे वास्तविक चित्र आहे.मात्र,लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मूग गिळून गप्प आहेत.जनतेतून या समस्येबाबत उठाव झाला आणि आंदोलन झाले की,प्रशासकीय यंत्रणा जागी होते.त्यानंतर काम हाती घेतले जाते. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पावसाळा सुरू होतो अश्यात केलेला रस्ता वाहून जातो अथवा रस्त्यावर मोठे खड्डे तरी पडतात.

विशेषतः कामाचा दर्जा चांगला नसण्यामागे अनेक कारणे असतात.यामध्ये जनतेचा पैसा वाया जातो आणि जनतेलाच खड्ड्यातून प्रवास करावा लागतो ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.प्रमुख शहरांसह महामार्गाची अवस्था देखील अनेक ठिकाणी बिकट झाली आहे.निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याने शासन आणि ठेकेदारां विरुद्ध जनतेत तेढ निर्माण झाला आहे.रस्ते बांधकामानंतर एक पाऊस देखील रस्ते पेलू शकले नसल्याचे अनेकवेळा दिसून आले.रस्त्यांची बिकट अवस्थेचे कारण म्हणजे शासनाला चांगले कंत्राटदार लाभले नाही त्यामुळे अशी गत झाली आहे.राज्यातील हजारो किलोमीटरचे रस्ते नव्याने करण्याची गरज आहे.शहरांचा विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो.रस्त्यांवरून होणारी वाहतूक ही सुरळीत आणि जास्त वेगाने होणे गरजेचे आहे.तरच विकासाला गती मिळते.परंतु सध्या रस्तेच खड्डेमय झाले असल्याने एक प्रकारे विकासाला खीळ बसत आहे.शिवाय रस्ते खड्डेमय असल्याने नियमित दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना पाठ,मान,कंबरदुखी बरोबरच मणक्याचे आजार जडले आहेत.