मौजा गोजोली येथे वंचित ची कार्यकारीणी गठित
तालुक्यात वंचीतकडे युवकांचा वाढता कल
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
*गोंडपिपरी :-* तालुक्यात वंचीत बहुजन आघाडी पक्ष बांधणीला वेग आला आहे. गाव तिथे शाखा,शाखा तिथे फलक निर्माण करणे, आणि पक्ष संघटन मजबूत करुण येणाऱ्या जी.प. व पंचायत समिती निवडणुकीत एक हाती सत्ता प्रस्थापित करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वंचीत बहुजन आघाडी जोमाने कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील गोजोली गावात दि.9 फेब्रुवारी रोज बुधवारला सां.7=00 वाजता कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात युवकांनी चांगला प्रतिसाद देत, पक्षाची ध्येय धोरणे लक्षात घेऊन कमिटीची स्थापना केली. यावेळी तेजराज डोंगरे वंचित आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, लक्षणजी रामटेके तालुका उपाध्यक्ष, भारत भाऊ चांद्रगडे तालुका उपाध्यक्ष,अभिजीत भगत अध्यक्ष धाबा सर्कल,चंदन झाडे धाबा सर्कल युवा कार्यकर्ता,आशिष मुंजनकर,इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.