मराठी शाळेतील शिक्षकाने ब्लॉकबस्टर "पुष्पा" चित्रपटावर केलेली कविता
मराठी शाळेतील शिक्षकाने ब्लॉकबस्टर “पुष्पा” चित्रपटावर केलेली कविता

सिद्धांत
१० फेब्रुवारी, मुंबई: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाने नटलेला “पुष्पा” हा सिनेमा सध्या जगभरातील बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यातील अल्लू अर्जुनने साकारलेले “पुष्पा” हे पात्र जगभरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले आहे. खासकरून अल्लू अर्जुनने या चित्रपटात केलेल्या खास नृत्याने तर लहान मोठ्यानं वेड लावले आहे.

पुष्पा सिनेमामध्ये अल्लू अर्जुनने चंदनाच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या व्यक्तीचे पात्र साकारलेले आहे. चित्रपटात चंदन तस्कर आणि पोलीस यांच्यामधील संघर्षाचे चित्रण केले आहे. चित्रपटातील मारधाडीचे प्रसंग, डायलॉग्स, त्याची चालण्याची स्टाईल कॉपी करून त्याचे अनेक विडिओ सध्या लोक सोशल मीडियावर टाकत आहेत.

पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर तो वाईटच असतो. सद्याच्या काळात कोणत्याही चित्रपतील मारधाडीचे सीन्स, शिव्या आणि अश्लिल शब्द वापरून बोललेले सवांद, हिंसक दृश्ये, कायदा सुव्यवस्थाच्या विरोधात लढणारी पात्र तरुणाईच्या, लहान मुलांच्या चटकन पसंतीस उतरतात. हे चिंताजनक आहे का?

करवीरमधील मराठी शाळेतील एका शिक्षकाने कवितेच्या स्वरूपात ह्याबद्दलचे आपले विचार मांडले आहेत. माध्यमिक विद्यालय नागाव, तालुका करवीर शाळेच्या फळ्यावर लिहिलेली ही कविता:

पुष्पा
कोण कुठला पुष्पा
चंदन तस्करी करतो
त्यानं दाखवलेला अविर्भाव
तरुणाईला वेड लावतो

उद्या तरणी पोरं
पोलिसांवर गोळ्या झाडतील
कायदा अन व्यवस्थेच्या
पार चिंध्या उडवतील

स्मग्लर अन दलाल
तरुणाईचे आयडॉल होतील
आदर्श जीवन जगणारे, हद्दपार होतील

माध्यमिक विद्यालय नागाव, तालुका करवीर शाळेच्या फळ्यावर लिहिलेली कविता

अनुकरण कुणाचं करावं
भान राखलं पाहिजे
आदर्श अन चारित्र्य
जीवापाड जपलं पाहिजे

छत्रपती शिवाजी महाराज
तरुणाईचे आदर्श ठरावेत
भारताच्या भूमीमध्ये
हजारो भगतसिंग निपजावेत

भारतमातेच्या रक्षणाची
शपथ आज घेऊया
वाकड्या मानेच्या फेंगड्या पायाच्या
पुष्पाला हद्दपार करूया.

तुम्हाला ह्या विषयाबद्दल काय वाटते ? नक्की कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here