कुठे मिळेल
कुठे मिळेल

प्रणय सोहमप्रभा,
१० फेब्रुवारी, नागपूर:  मी स्टेशनरीच्या दुकानात उभा होतो . इतक्यात एक माझ्याच वयाचे गृहस्थ तिथ आले. आणि दुकानदाराला विचारू लागले , ओ, भारताची राज्य घटना किंवा भारताच संविधान नावाच पुस्तक आहे का ? (रोहा शहरातल एक स्टेशनरी दुकान.) दुकानदार म्हणाला नाही. नाही म्हणाल्या बरोबर ते गृहस्थ जाऊ लागले .मी सुध्दा लगेच निघालो, त्यांना गाठल ,आणि विचारल,दादा तुम्ही संपूर्ण रोहा पालथा घातलात तरी एकाही दुकानात भारताच संविधान मिळणार नाही. ते गृहस्थ म्हणाले होय वो.

मी सगळ्या दुकानात विचारत विचारत आलो. कुठच नाही मिळाल. मी त्यांना म्हंटल दादा ,खर तर प्रत्येक बुकस्टाॕलवर हे पुस्तक असायलाच पाहिजे होत. पण नाही हेच वास्तव आहे .

आपल्या देशातल्या नागरीकांना, हक्क अधिकार आणि निर्धास्त जगण्याच स्वातंत्र्य देणार संविधान माहीत नाही .ते काय असत , कस दिसत , हे सुध्दा या सत्तर वर्षात नव्याण्णव टक्के लोकांनी पाहिलेल नाही .बाजारात सर्रास वेगवेगळ्या धर्माचे धर्म ग्रंथ खुले आम विकले जातात .पण या सर्व ग्रंथांपेक्षा लाख पटीन श्रेष्ठ असलेल संविधान बाजारात सहज कुठच मिळत नाही .का ? हा प्रश्नच कुणाला पडत नाही .जाणीवपूर्वक हा प्रश्नच कुणाला पडू दिला गेला नाही .दर वर्षी सव्वीस जानेवारी साजरी होते .पण या दिनाला प्रजा सत्ताक दिन संबोधल गेल .संविधान दिन नाही म्हंटल . जगान मान्य केल की भारताच संविधान हे सर्वश्रेष्ट संविधान आहे .परंतु भारतातील मनुवादी प्रवृत्तीन ते सामान्य माणसापर्यंत येऊच दिल नाही .का ? कारण

1) संविधानाची ताकद त्यांना माहीत आहे . संविधान समाजात रुजल तर संविधानान दिलेल्या समता, स्वातंत्र्य, मैत्री, न्यायाची अंमलबजावणी करावी लागेल. विषमतेची फळ कडू होतील . 2)संविधान लिहील डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी . एका अस्पृश्य समाजतल्या माणसान. ही या देशातील मनुवादी लोकांची पोटदुखी आहे .

ज्यांच्या साठी 340 कलम लिहील ते OBC सुध्दा संविधान जाणून घेण्या च्या मानसिकतेचे नाहीत आणि या देशातील तमाम स्त्री वर्ग जो मनुवादी शोषणातून, पिळवणूकीतून संविधानामूळ मूक्त झाला त्या स्त्री वर्गानही संविधानाचा द्वेश करण सोडलेल नाही . हे वास्तव आहे .मनुस्मृतीत लिहिलय ढोर गँवार पशु नरनारी सब है ताडन के अधिकारी. अस्पृश्य, अशिक्षित आणि सर्व स्त्रीया शोषण करण्यासाठीच आहेत अस या मनुस्मृतीन म्हंटलय . मात्र संविधानातील 340 कलमान OBC समाजाच जीवन नटलय. अस असताना यांना शोषण करणा-या मनुस्मृतीचा मोह आहे .

आज सत्तर वर्ष होऊन गेले . या देशान देशात संविधान राबवलच नाही .हे संविधानिक पध्दतीन निवडून येतात आणि कारभार मनुस्मृतीच्या विकृत प्रवृत्तीन करतात .म्हणूनच बाबासाहेब म्हणाले होते, मी लिहीलेल संविधान कितीही चांगल असल तरी ते राबवणारे लोक चांगले नसले तर या संविधानाचा काहीच उपयोग होणार नाही. आजची अराजकता पाहून वाटतय आजवर या देशाला संविधान चालवणारे लायक लोक भेटलेच नाहीत .

हे चित्र बदलल पाहिजे . संविधान जागृती झाली पाहिजे. संविधान वाचवल पाहिजे .ते वाचल तर देश वाचेल ,देश वाचला तर देशातील प्रत्येकजण वाचेल.शत्रू पण वाचेल मित्र पण वाचेल .हे संविधान शाळेत पहिली पासूनच शिकवल पाहिजे.
ते गृहस्थ शांतपणे ऐकत राहीले . ते उभे आहेत ऐकत आहेत हे माझ्या लक्षातच नाही राहील .ते म्हणाले , होय बरोबर बोलताय. मी यु ट्युबवर एक भाषण ऐकल आणि बाजारात संविधान मिळतय का ते शोधल . पण कुणाकडच नाही हा महान ग्रंथ. ते मला विचारू लागले, दादा कुठे मिळेल ?

मी त्यांना सांगितल,दादा हा महान ग्रंथ बाजारात कुठच मिळत नाही. कुणीही वाचावा, कुणीही विकावा, कुणीही विकत घ्यावा अस असताना हा महान ग्रंथ बाजारात विकत मिळत नाही .हा महान ग्रंथ महिन्याचे तीस दिवस, वर्षाचे बारा महिने दोनच ठिकाणी विकत मिळेल.
१) दादर चैत्य भूमी.
२) नागपूर दीक्षा भूमी.
तस वाचायला हव असेल तर माझ्या घरी आहे . घेऊन जा आणि वाचून परत द्या . ते म्हणाले नाही . मला स्वतःला हवय . वाचायला ही आणि घरात प्रदर्शनी भागी ठेवायलाही.

26 जानेवारीला धम्म संस्कार शाळेत मुलांना विचारल, किती जणांनी संविधान हा ग्रंथ हातात घेऊन पाहिलाय ? एकाही मुलान हात वर केला नाही. मला खूप वाईट वाटल .कारण बा भीमाचे अनुयायी म्हणून आम्ही कमी पडलोय .हा देश मनुवादी मानसिकतेचा आहे हे मान्य आहे परंतु हे मान्य करताना आपण बा भिमाचे अनुयायी असून आमच्या घरात संविधान नाही.आपण जयभीम बोलायच्याही लायकीचे नाही . आम्हा बौध्दांच्या घरात किमान दोन ग्रंथ पाहिजेच पाहिजे . पहिला तथागत बुध्द आणि त्यांचा धम्म. आणि दुसरा भारतीय संविधान. हे दोन्ही ग्रंथ सिंम्बाॕल आॕफ द नाॕलेज ही पदवी मिळालेल्या आपल्या बापान लिहिलेत याचा आपल्याला किती गर्व पाहिजे ! वाचता येणा-यांच्याच नव्हे तर वाचता न येणा-यांच्या घरातही पाहिजे .का ? कारण कुणीही असा बौध्द सापडणार नाही की तो म्हणेल मी हे ग्रंथच पाहिले नाही .घरात आसले की वाचलेही जातील .

डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी जितका सखोल अभ्यास केला तितका कुणीच केला नसेल आजवर. डाॕ. बाबा साहेब आंबेडकरांनी बुध्द धम्माचे मुख्य दोन यान हिनयान आणि महायान, यांचा आणि यांच्या अनेक शाखांचा सखोल अभ्यास करून आपल्या सर्वांना कळेल असा धम्म ग्रंथ लिहिला . आणि तो आपल्या घरात नसण आणि असून न वाचण . या पेक्षा बेईमानी ती कोणती ? जगान मान्य केलेला सर्वश्रेष्ठ ग्रंथ , भारतीय संविधान आपल्या घरात नसण . आपल्या मुलांना त्याची ओळख नसण हे सुध्दा लांच्छनास्पद कृत्य आहे . हे मान्य केलच पाहिजे . त्याला जबाबदार आपण आहोत.

अजून वेळ गेलेली नाही . संविधान जागृती आणि बा भिमाच्या विश्वासातला नितीवान समाज घडवण्यासाठी आपल्याला कार्य केल पाहिजे .कर्तव्य भावनेन काम केल पाहिजे . गावागावात हे काम चालू झाल पाहिजे . वर्षातून एकदा वक्ते बोलऊन केलेल प्रबोधन टिकत नाही .अभ्यासू प्रवृत्तीन धम्म आणि संविधान शिकवल पाहिजे. शिकल पाहिजे . तरच संविधान वाचवणारे आणि  देश संविधानावर चालवणारे लोक तयार होतील . त्या साठी गावागावातू प्रतिसाद मिळाला पाहिजे हीच अपेक्षा. उशीर तर झालेलाच आहे .अधीक उशीर नको. आम्ही तयार आहोत आपण तयार व्हा .
– प्रणय सोहमप्रभा, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here