उधारीचे पैसे परत मागीतल्याने कशेने पेट्रोल पपांवर हाणामारी
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
माणगांव :-माणगांव तालुक्यातील कशेने गावच्या हद्दीत असणारे सि एन जि पेट्रोल पंपमध्ये दि.5/2/23 रोजी आरोपी अक्षय जाधव, सिद्धेश पोटले, विकी मुंढे रा. कशेने ता. माणगांव जि. रायगड याने सदर पेट्रोल पंप येथे उधारीवर पेट्रोल भरले होते. परंतु आरोपी एक दोन आणि तीन याचे सोबत सदर पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्याकरिता आले असता आरोपी एक याच्याकडे फिर्यादी राजेश देवचन्द पवार वय वर्ष २५ रा.कशेने आदिवासीवाडी ता. माणगांव यांनी उधारी चे पैसे आरोपीकडे मागितले असता या गोष्टीचा आरोपी 1,2,3 यांना राग आल्याने फिर्यादी इसम यास हाताबुक्याने मारून शिवीगाळ केली व तुम्ही पपांच्या बाहेर कुठे आढळून आलात किंवा दिसलात तुम्हाला आम्ही बघून घेऊ तसेच आरोपी एक याने तुम्ही आदिवासी कातकरी तुमची लायकी काय तुम्ही आमच्याकडे उधारीचे १०० रुपये मागता काय या गोष्टीचा राग धरून हाणामारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त की फिर्यादी इसम राजेश देवचंद पवार यांनी माणगांव पोलीस ठाण्यात खबर देतात माणगांव पोलीस ठाणे यांनी कॉ.गु.रजि. नं.२५/२०२३ नुसार भा. द. वि. स कलम ३२३,५०४,५०६,३४ अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतीबंधक ) अधिनियम १९८१ कलम ३(१) (r) ३(१) (s)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीवर्धन, अति कार्यभार माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी व माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सह. पोलीस निरीक्षक आस्वर व पो. ना. खिरीट हे करीत आहेत.