बल्लारपूर ठाणेदार आसिफराजा ऍक्शन मोडवर
नऊ लाखाच्या अवैध दारू साठा जप्त
🖋️ साहिल सैय्यद..
तालुका प्रतिनिधि घुग्घुस
📲 9307948197
बल्लारपूर : घुग्घुस येथून नुकतेच बल्लारपूर पोलीस स्टेशनला रुजू झालेले पोलीस निरीक्षक आसिफराजा हे ऍक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे
शहरातील कन्नमवार वॉर्डात देशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत TATA ACE वाहन क्रं MH 33 T 4673 (छोटा हत्ती ) या वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहनावरील चालक हा वाहन सोडून पळून गेला
सदर वाहनांची झळती घेतली असता वाहनांमध्ये 80 बॉक्स देशी दारू रॉकेट ब्रँडचे 90 मिलीचे 8000 बाटल्या अंदाजे किंमत 2,80,000 हजार व टाटा एस या वाहनाचे 700,000 असे मिळून 9,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
सदर आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे