अंमली पदार्थ विरोधीदिनाच्या निमित्य नेरळ पोलीस यांनी भरवली शालेय स्पर्धा; “व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या”

56
अंमली पदार्थ विरोधीदिनाच्या निमित्य नेरळ पोलीस यांनी भरवली शालेय स्पर्धा; “व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या”

अंमली पदार्थ विरोधीदिनाच्या निमित्य नेरळ पोलीस यांनी भरवली शालेय स्पर्धा;
“व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या”

अंमली पदार्थ विरोधीदिनाच्या निमित्य नेरळ पोलीस यांनी भरवली शालेय स्पर्धा; “व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या”

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ;- दहशादवाद विरोधी शाखा (ATB)/अंमली पदार्थ विरोधी जनजागृती २०२३-३३ अंतर्गत नेरळ पोलीसठाणे यांच्या वतीने एल.ए.ई.एस. इंग्लिश हायस्कूल व जुनियर कॉलेज नेरळ. दिनांक ०९.फेब्रुवारी रोजी येथे इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचे “व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या” या विषयांवर पोस्टर स्पर्धा व इयत्ता ११ वी ते १२ वी यांची निबंध स्पर्धा दिनांक ९ फेफ्रुवारी रोजी घेण्यात आली दोन्ही स्पर्धाकामधील प्रथम तीन क्रमांकाची निवड करण्यात आली. पोस्टर स्पर्धेत कु. मोनी मुकेश सहानी प्रथम क्रमांक, कु. गार्गी अभिजित भोसले दुसरा क्रमांक, कु. मानसी संजय शमा दुसरा क्रमांक, कु. किमया चेतन पार्टे तृतीय क्रमांक, निबंध स्पर्धा मध्ये कु. स्वराली अमित साळोखे प्रथम क्रमांक, कु. मधुरा प.शहासने दुसरा क्रमांक, अश्विनी हरिदास नायर तृतीय क्रमांक पटकावले असून मुलांचे कौशल्य व बालवयातील विचार सरणी व सामाजिक संदेश पाहून सर्व जण भाराऊन गेले.