थेरोंडा समुद्रकिनारी आगीचे तांडव

33

थेरोंडा समुद्रकिनारी आगीचे तांडव

झोपडीसह मच्छीमार जाळी जळून खाक

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील थेरोंडा खंडेरावपाडा समुद्रकिनारी रविवारी (दि. 9) रोजी रात्री 2.30 वा.च्या सुमारास झोपडीला आग लागली, या आगीत झोपडीसह मच्छीमार जाळी जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

थेरोंडा खंडेरावपाडा समुद्रकिनारी दत्‍तात्रेय पोसणे यांच्या झोपडीला आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी खंडेरावपाडा ग्रामस्थ व विष्णू पोसणे आदींनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये पापलेट, कोळंबी, मांदेली, भिंजी, सोलट, आदी विविध प्रकारची मच्छीमारीची जाळी यामध्ये जळून खाक झाली आहे. आग कशामुळे लागली ते अद्याप कळू शकले नाही. या आगीची माहिती विष्णू पोसणे यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच, या आगीबाबत व नुकसानीबाबत मत्सव्यवसाय विभागाकडे माहिती देण्यात आली असून, मत्सविभागाचे परवाना अधिकारी महादेव नांदोस्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या आगीबाबत मच्छीमाराच्या जय मल्हार कोळी समाज संघटना अध्यक्ष गोरखनाथ नवरीकर यांनी खेद व्यक्‍त केला आहे. ग्रामस्थानी समुद्र किनारी सिसिटिव्ही बसवावे अशी मागणी जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे केली होती. परंतू, यांची पुर्तता न झाल्याचे त्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.