Aghori act from domestic dispute, beating of girls including widow, cutting off nephew's ear with a scythe.
Aghori act from domestic dispute, beating of girls including widow, cutting off nephew's ear with a scythe.

घरगुती वादातून अघोरी कृत्य, विधवा महिलेसह मुलींना मारहाण, कोयत्याने पुतणीचा कान कापला.

शेतीच्या वादातून विधवा भावजयीसह मुलींना मारहाण, कोयत्याने स्वताःच्या पुतणीचा कान कापला.

 Aghori act from domestic dispute, beating of girls including widow, cutting off nephew's ear with a scythe.

✒बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी✒
बुलडाणा,दि.10 मार्च:- आज शेती आणि जमीनीच्या वादातुन अनेक वाद झाले आहे. एका घराचे अनेक तुकडे झाले असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. शेतीची वाटणीच्या वादातुन आणि घरगुती क्षुल्लक कारणावरून दिराने आपल्या मोठ्या भावाच्या विधवेसह तिच्या दोन मुलींना अमानुषपणे मारहाण केल्याची धकादायक घटना घडली आहे. विधवा महिलेचा दीर आरोपी प्रभाकर हावरे याने आपल्या भावजयी ला मारहाण केली त्यानंतर त्याने आपल्या पुतणी वर कोयत्याने वार करत तिचा कान कापला कापल्याची गंभीर घटना दि. 6 मार्च शनिवार रोजी घडली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सवणा गावातील विधवा महिला तिच्या दोन मुलींसोबत राहते. शेतात मिळेत तिथे मजुरी करुन ही महिला आपल्या परीवाराचा उदर्निर्वाह करत आहे. 2015 साली महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हापासून या महिलेचा दीर म्हणजेच आरोपी प्रभाकर हावरे महिलेसोबत रोज काहींना काही कारणांवरुन सतत भांडण काढतो, शिवागाळी करत असतो असा आरोप महिलेने केला.

6 मार्च शनीवार ला रात्रीला घरा शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत बोलत असताना आरोपी प्रभाकर हावरे हा हातात कोयता घेऊन आला. कोणतेही कारण नसतांना आरोपीने शिवीगार देने सुरु केले. त्यानंतर मुलगी आणि विधवा महिलेला मारहाण सुरु केली. या मारहाणीमध्ये मुलीचा डावा कान कोयत्याने कापला गेला. जखम झाल्यामुळे कानातून मोठ्या प्रमाणात रक्त निघत असतांना तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असताना विधवा महिलेच्या हातालासुद्धा जखम झाली.

यावेळी दुसरी मुलगी भांडण सोडविण्यासाठी आली असता आरोपी प्रभाकर हावरे त्याने तिच्यासुद्धा कानावर कोयता मारून जखमी केले. आरोपीने या आधीसुद्धा शेतीची वाटणी आणि पेरणीच्या कारणावरून अशाच प्रकारची मारहाण केल्याचा आरोप विधवा महिलेने केला आहे. मात्र, त्यावेळी गावातील लोकांनी भांडण आपसात मिटवल्याने पोलिसात तक्रार करण्याची गरज पडली नाही, असं या महिलेने सांगितले.

दरम्यान, आरोपी प्रभाकर हावरे हा नेहमी शिवीगाळ करतो, जीवे मारून टाकण्याची तसेच खून करण्याची धकमीसुद्ध देतो असा आरोपही या महिलेने केला. या प्रकरणी चिखली पोलीस तपास करत असून एका मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here