भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; एक ठार तर एक जखमी , ब्राम्हणी फाटा येथील अपघात.

62

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; एक ठार तर एक जखमी , ब्राम्हणी फाटा येथील अपघात.

Bhardhaw truck hits two-wheeler; One killed and one injured in an accident at Brahmani Fata.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
कळमेश्वर,दि.10 मार्च:- बाम्हणी फाटा येथे भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजन ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 9 फरवरी रोजी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान घडली. म्रुतकाचे नाव शेषराव रामराव काळे वय 60 वर्ष राहणार सवंद्रि तालुका कळमेश्वर असे असून चंद्रशेखर काळे वय 58 वर्षे राहणार सवंद्री ता. कळमेश्वर असे जखमीचे नाव आहे.

Bhardhaw truck hits two-wheeler; One killed and one injured in an accident at Brahmani Fata.

प्राप्त माहितीनुसार हे दोघे भाऊ आपली होंडा दुचाकी क्रमांक एम एच 40 जे 7875 ने सवंद्रि या गावावरून काही कामानिमित्त कळमेश्वर येथे येत असताना सावनेर वरून कळमेश्वर कडे येणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच 40 एन 1740 च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणाने आपले वाहन चालवून ब्राम्हणी फाटा येथे मागाहून येनार्‍या दूचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी वर मागे बसलेले शेषराव काळे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक चंद्रशेखर काळे हे गंभीर जखमी झाले त्यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता नागपूर येथे पाठविण्यात आले आहे तर मृतक शेषराव काळे यांचा कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी नंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला कळमेश्वर पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश वानखेडे हेडकॉन्स्टेबल रवी मेश्राम करीत आहे.