चंद्रपूर महानगर भाजपाच्या संघटनात्मक बांधणीला वेग, भाजयुमोच्या 5 मंडळ अध्यक्षांची घोषणा.
जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केली घोषणा.
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी ,महानगर चंद्रपुर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी महानगरातील 5 मंडळाचे भाजयुमो मंडळ अध्यक्ष जाहीर केले आहेत.यात प्रामुख्याने संजय पटले,अमित गौरकर,गजानन भोयर,हिमांशू गादेवार व गणेश रामगुंडवार यांच्या नावांचा समावेश आहे.
भारतीय जनता पार्टी तर्फे सद्या मोठया प्रमाणात संघटनात्मक रचना पूर्ण केली जात आहे.यात मुख्य कार्यकारिणीसह 27 प्रकोष्ठचा समावेश आहे.भाजपाच्या संघटनात्मक रचनेनुसार महानगरात 5 मंडळ असून,पूर्व मंडळ (बंगाली कॅम्प) साठी पटले, पश्चिम मंडळ (सिव्हिल लाईन) करिता अमित गौरकर, उत्तर मंडळ (तुकुम) करिता हिमांशू गादेवार तर मध्य मंडळ (बाजार) साठी गणेश रामगुंडवार या युवकांची निवड भाजयुमो जिल्हाध्यक्ष (श) विशाल निंबाळकर यांनी केल्यावर ही घोषणा करण्यात आली. मंडळातील सर्व युवकांचे एकत्रीकरण करून त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करावे, असे आवाहन डॉ गुलवाडे यांनी केले आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजपा (श) महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, मंडळ अध्यक्ष दिनकरराव सोमलकर, रवी लोणकर, संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार व विठ्ठलराव डुकरे आदींनी अभिनंदन केले आहे.