In Chandrapur district, 43 corona-free, 82 positive in last 24 hours; A death.
In Chandrapur district, 43 corona-free, 82 positive in last 24 hours; A death.

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 43 कोरोनामुक्त, 82 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू.

आतापर्यंत 23,258 जणांची कोरोनावर मात, ॲक्टीव पॉझिटिव्ह 663

In Chandrapur district, 43 corona-free, 82 positive in last 24 hours; A death.
In ,

सौ .हनिशा दुधे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 9 मार्च :- जिल्ह्यात मागील 24 तासात 43 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 82 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 322 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 258 झाली आहे. सध्या 663 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 24 हजार 354 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 97 हजार 962 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये आनंदवन वरोरा येथील 55 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 401 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 363, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 82 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 33, चंद्रपूर तालुका नऊ, भद्रावती सात, ब्रम्हपुरी पाच, नागभीड एक, सिंदेवाही तीन, मूल सहा, चिमुर दोन, वरोरा 15 व कोरपना येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here