Nafdo felicitates women working in various fields at Rajura.
Nafdo felicitates women working in various fields at Rajura.

राजुरा येथे विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा नेफडो तर्फे सत्कार.

स्त्रियांनी आत्मनिर्भर बनावे. – विजय जांभूळकर

 Nafdo felicitates women working in various fields at Rajura.

मिडिया वार्ता न्यूज़,
संतोष मेश्राम, तालुका प्रतिनिधी.

राजुरा, 9 मार्च:- संपूर्ण जगभरात जागतिक महिला दीनानीमीत्य महिलांच्या कार्यकर्तूत्वाला तसेच विविध क्षेत्रात आपले नावलौकीक करीत आत्मनिर्भर होणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करण्याकरीता विविध कार्यक्रम उपक्रम राबविले जातात. महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे. चुल आणि मूल यापलीकडेही महिलांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करने काळाची गरज आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून विजय जांभूळ नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे जिल्हा संघटक यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे अवचीत्य साधून राजुरा येथे विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 Nafdo felicitates women working in various fields at Rajura.

यावेळी सत्कार करण्यात आलेल्या महिलांमधे आर्शिया जूही अश्पाक मोहम्मद ,मुख्याधिकारी नगर परिषद ,राजुरा , मुमताज जावेद अब्दुल ,सभापती पंचायत समिती राजुरा ,वज्रमाला अजय बतकमवार ,सभापती महिला व बालकल्याण समिती नगर परिषद राजुरा, अल्का सदावर्ते, महिला तालुका अध्यक्षा, नेफडो, राजुरा, कल्याणी प्रशांत गुंडावार ,माजी अध्यक्षा ,इनरव्हील क्लब ,राजुरा उज्वला किशोर जयपूरकर नगरसेविका ,प्रभाग क्र.१(अ), न.प. राजुरा, माणिक महेंद्र उपलंचिवार, शहर अध्यक्षा भाजपा महिला आघाडी राजुरा, क्रुतीका सुरेश सोनट्टक्के, स.शी. शिवाजी हायस्कूल, राजुरा गीता भारत रोहणे, नगरसेविका प्रभाग क्र.९ (ब) न.प. राजुरा, डॉ. अनिता रणधीर, वाणिज्य विभाग प्रमुख, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा, अर्चना राजू ददगाळ, महिला शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी राजुरा यांना ग्रामगीता भेट वस्तु व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

 Nafdo felicitates women working in various fields at Rajura.

तर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या तालुका सचिव अँड.मेघा धोटे,संघटीका सूनैना तांबेकर, राजश्री उपगंलावार, उपाध्यक्ष रजनी शर्मा यांना भेटवस्तु व पुष्प देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेफडो चे नागपूर विभाग सचिव बादल बेले यांनी केले. तर प्रास्तावीक उमेश लढी यांनी व आभार मेघा धोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नेफडोचे तालुका उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते, तालुका अध्यक्ष संतोष देरकर, आशीष करमरकर, नितीन जयपुरकर, संदीप पोगला, आकाश वाटेकर, मनोज तेलिवार आदींसह नेफडो च्या पदाधिकार्याँनि अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here