धामनगावरेल्वे येथे ग्रामीण रुग्णालयात हलगर्जी पणाचा कळस, अपघातग्रस्त रुग्णानेच स्वतःसाठी आणले इंजेक्शन.
✒अमरावती जिल्हा प्रतिनिधी✒
अमरावती:- जिल्हातील धामणगावरेल्वे येथे ग्रामीण आरोग्य रुग्णालयात डॉक्टरांनी हलगर्जीपणाचा कळस गाठला असल्याची माहिती समोर येत आहे. एका अपघातग्रस्त रुग्णाला
चक्क नातेवाइकांसह स्वत:साठी टीटीचे इंजेक्श्न आणण्यासाठी औषधांच्या खासगी दुकानात जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र शासनाने अपघातग्रस्तासाठी विविध योजना आणि तातडीने रुग्णावर उपचारासाठी अनेक नियम बनवले आहे. कुठलाही अपघात झाला की जखमींना रुग्णालयात नेऊन उपचार करणे हा महत्वपुर काम असते. मात्र, अमरावती जिल्हातील धामणगाव येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयात चक्क अपघातग्रस्त श्रावण डोहळे यांना नातेवाइकांसह स्वत:साठी टीटीचे इंजेक्श्न आणण्यासाठी औषधांच्या खासगी दुकानात जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी असलेल्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात सध्या औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या भांडारात औषध नसल्याने नातेवाइकांना बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. तसेच विविध आजारांवर दिल्या जाणाऱ्या लसीही उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या समस्येवर उपाययोजना होईल का? हा यक्षप्रश्ना निर्माण झाला आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील श्रावण डोहळे यांच्या दुचाकीला मंगरूळ रस्त्यावर अपघात झाला. यामध्ये ते स्वत: व त्यांची मुलगी व पत्नी जखमी झाली. प्रथमोपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. परंतु, रुग्णालयात टीटीचे इंजेक्शीन नसल्याने अपघातात जखमी असलेले श्रावण डोहळे यांना टीटीचे इंजेक्शआन खरेदी करायला बाहेरच्या मेडिकल स्टोअर्समध्ये जावे लागले असल्याचा प्रकार रविवार 7 तारखेला घडला.
येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच बाह्यरुग्ण विभागात रुग्ण येत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून टीटीच्या लसीचा तुटवडा असल्याने बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. खासगी उपचार परवडत नसल्याने एकमेव ग्रामीण रुग्णालय आधार आहे. औषधाबाबत विचारणा केल्यास वादावादीचे प्रसंग घडतात. त्यामुळे किमान महत्त्वाच्या लसी उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशी मागणी समोर आली आहे.