यवतमाळ जिल्हातील वाठोडा -रानवड गट ग्रा.पं. मध्ये विकास कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार.
माहिती अधीकाराचा माहितीतुन मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार बाहेर निघण्याचा संकेत. शेख नईम शेख रहिम याचा आरोप
साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रातिनिधि
यवतमाळ राळेगाव:- यवतमाळ जिल्हातील राळेगाव पं स अंतर्गत येणारी गट ग्रा. पं. वाठोडा – रानवड भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाल्याचे गावातील नागरीकांकडुन बोलले जात आहे.
शेख नईम शेख रहीम रा. वाढोणा बाजार यांनी माहिती अधिकारात ग्रामपंचायतला माहिती माघितली आहे. माहिती मध्ये चार वर्षाचे ऑडिट रेकॉर्ड तथा रानवड येथे सुरु असलेले मशानभूमीचे बांधकाम रोडची माहिती मागितल्याने ग्रामसेवकाचे धाबे दणाणले असल्याने अनेक लोकांन कडुन बोलले जात आहे. सदर वाठोडा- रानवड गट ग्रा. पं. असून ही ग्रा. पं. पेसा क्षेत्रामध्ये येतात त्यामुळे शासनाकडून या ग्रामपंचायतला अधिका अधिक निधी प्राप्त होत असल्याने अधिकारी व पदाधिकारी अशा ग्रामपंचायत भष्ट्राचार करण्यात कुठलीही कसर सोडत नसल्याचे उदाहरण समोरासमोर येत आहे.
या ग्रामपंचायतवर वरीष्ठ पंचायत समिती अधिकाऱ्याच्या कृपा असल्याने स्थानिक अधिकारी व पदाधिकारी लंबा हात मारून निसंचित होतात गावाचा विकास कामाच्या पैशांवर डल्ला मारून पाच वर्षात स्वतःचा विकास कसा करता येईल असे वातावरण तयार करून स्वतःच वर्चस्व तयार करतात मौजा रानवड भूमापण क्र.19 या शेतजमिनीमध्ये मशानभूमीचे बांधकाम शेडचे बांधकाम सुरु असून हे काम निकृष्ट दर्जाचे असतांना पं. सं अधिकाऱ्यांनी या कामाकडे फिरून सुद्धा पाहिले नाहीत कुठल्याही कामातुन पं. सं. अधिकाऱ्यांला कमिशन मिळाले कि काम कुठल्याही दर्जाचे असो, यांचे त्यांना काहीही देणे घेणे नसतात त्यामुळे स्थानिक अधिकारी पदाधिकारी भ्रष्टाचारी बनले असून वरिष्ठाच्या पाठबळाची संगतीचा परतभाव आहे. असे दिसून येते या प्रकारामध्ये वाठोडा -रानवड गट ग्रा. पं माहिती अधिकारामध्ये एका सामान्य माणसाने माहिती अधिकाराचा अर्ज सादर केल्याने अधिकारी पदाधिकाऱ्याची झोप उडाली असून रानवड च्या मशान भूमीच्या शेडच्या बांधकामाची पाहणी जिल्हा परिषद गुण नियंत्रण अधिकाऱ्याच्या पथका अंतर्गत व्हावी म्हणजे सत्यता बाहेर येण्यास वेळ लागणार नाही असे गावातील लोकांमध्ये बोलले जात आहे.
शेख नईम शेख रहीम रा. वाढोणा बाजार याचा आरोप.
यांनी ग्राम पंचायत वर असा आरोप केला की येथील विकास कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला आहे. त्यांनी माहिती अधिकारत माहीती माघीतली आहे. जोड पत्र अ, वाठोडा रानवड गट ग्रा. पं च्या कामात भ्रष्टाचार असल्याचे बोलले जात आहे.