कोरोनामुळे ‘माझ्या शिक्षणाचं काय होईल?’ या काळजीने केली विद्यार्थ्याने आत्महत्या.

50

कोरोनामुळे ‘माझ्या शिक्षणाचं काय होईल?’ या काळजीने केली विद्यार्थ्याने आत्महत्या.

 'What will happen to my education?' The student committed suicide with this concern.

✒परभणी जिल्हा प्रातिनिधि✒
परभणी,दि 10 मार्च :- तालुक्यातील धर्मापुरीत येथील एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाने महाराष्ट्रात पहिले लॉकडाउन आणि आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद आहे. शालेय परिक्षेवर प्रश्नचिन्ह उभ राहात आहे. याच विचारातुन परभणी तालूक्यातील विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल उचलुन घरात छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेउन आत्महत्या केली आहे.

सातत्याने कोरोना वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउन आणि संचारबंदी लागत असल्याने आपल्या शिक्षणाचे पुढे काय होईल, या विचाराने धर्मापुरी येथील एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सोमवारी, ८ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शुभम गंगाधर उगले वय २० वर्ष असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो परभणीतील एका महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिकत होता. शिक्षणाच्या चिंतेतून घरी छताच्या पंख्याला साडी बाधून गळफास घेत शुभम आपले जीवन संपविले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेभाऊ चव्हाण, फौजदार काजी, कर्मचारी सुभाष चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस कर्मचारी सुभाष चव्हाण हे करीत आहेत.