निंभा गावात जागतिक महिला दिनानिमित्य केअर इंडियाचा कार्यक्रम.

57

निंभा गावात जागतिक महिला दिनानिमित्य केअर इंडियाचा कार्यक्रम.

 World Women's Day Care India's program in Nimbha village.

 ✒प्रा. अक्षय पेटकर प्रतीनिधी✒

समुद्रपूर :- तालुक्यातील निंभा गावामध्ये केअर इंडिया यांच्या माधमातून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. गॅप इंक. फायनान्शियल अँड केअर इंडिया द्वारा संचालित महिला आणि जल प्रकल्प महिलांना वैयक्तिक प्रगती आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदलांसाठी केअर इंडियाच्या माध्यमातून खेड्यातील वैयक्तिक प्रगतीच्या विविध विषयांवर विनामूल्य प्रशिक्षण प्रदान करते.

कार्यक्रमात महिला दिनाचे महत्व ग्रामीण महिलांना कळावे याबाबत महिलांकडून संवाद करून त्यांना बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, तसेच उपस्थित महिलांकडून शपथ घेण्यात आली की, भारतीय संविधान, काणून आणि संयुक्त राष्ट्र तर्फे दिल्या गेल्या महिला अधिकारांचे सदैव पालन करेल आणि महिलांच्या लिंग आधारित होणाऱ्या कोणत्याही प्रकारचे भेदभाव, शोषण, हिंसा आणि अत्याचारा चा होइल त्या प्रकारे विरोध करेल. सोबतच महिलांनी आपले कलाकौशल्य सादर केले तसेच रांगोळीच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निंभा ग्रामपंचायत चे सरपंच श्री. जितेंद्र दांडेकर तर प्रमुख पाहुणे ग्रा.प. सदस्या वनिता बर्डे तसेच केअर इंडिया ऑर्गनायझेशनचे तालुका समन्वयक नितीन माताघरे, ट्रेनर गौरव इसपाडे, मोबिलाईझर वर्षाताई दडमल तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केअर च्या प्रशिक्षणार्थी व इतर महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनु जांभुळे यांनी केले तर आभार वर्षा दडमल यांनी मानले.