शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपुर येथे सन्माण गृहिणींचा कार्यक्रम संपन्न..!
प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684
चंद्रपूर : – ग्रामीण भारत
महीला गृह उद्योग मंडळाच्या वतीने दि.०८/०३/२२ रोजी जागतिक महीला दिनाचे औचित्य साधुन जि.प.चंद्रपुर येथिल शिक्षण विभागातील विविध पदावर वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा “सन्माण गृहिणींचा” या कार्यक्रमातंर्गत सन्माणपञ व पुष्पगुच्छ देऊन सन्माण करण्यात आला.यावेळी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन लाभलेले मा. श्री. दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.चंद्रपुर, तसेच अध्यक्षस्थानी मा.श्री अशोक अंबागडे,संचालक ग्रामिण भारत महिला गृह उद्योग मंडळ. तसेच प्रमुख पाहुणे म्हनुन लाभलेले मा.श्री.लोकेश खंडाळे, विस्तार अधिकारी जि. प. चंद्रपुर, या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते गृहिणींचा सन्माण करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा.अशोक अंबागडे यांनी अध्यक्षीय भाषण करतांना म्हटले की,
ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक गृहिणींपर्यंत पोहचुन त्यांना सक्षम व कुशल बनवण्याचे शस्ञ हाती घेऊन त्यांना उद्योजकीय करण्याचा आमचा मानस आहे.तसेच आजचे जिवन हे अतिशय धकाधकीचे असतांना सुद्धा आरोग्याचे हित जोपासणे काळाची गरज आहे, त्याबाबत आम्ही ग्रामीण भारत च्या माध्यमातुन सामाजिक उपक्रम लक्षात घेता “आरोग्यमिञ हेल्थ कार्ड ” चे आयोजन करून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा स्तुत्य उपक्रम जनतेच्या सेवेकरीता राबवित आहो असे सागितले.यावेळी उपस्थितीत मा.श्री.सौरभ मादासवार, श्री.सागर कातकर, व इतर मान्यवर होते. या कार्यक्रमाचे संचालकीय भाषण मा.श्री.सुर्यकांत भडके, समग्र कक्ष अधिकारी जि.प.चंद्रपुर यांनी केले, मा.श्री. प्रशिल भेसेकर, सदस्य,ग्रामीण भारत यांनी आभार प्रदर्शन केले.