” मौजा देव्हाडी, आंबागढ, सिहोरा, बघेडा, गर्रा, डोंगरी बूज. या गावामध्ये आठवडी बाजारात ठेकेदाराकडून दुकानदारांची सर्रास लूट “
” जिल्हा परिषद प्रशासन चूप, दुकानदारांची फसवणूक, ठेकेदार मात्र खुश “
✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
तुमसर :- सविस्तर वृत्त असे आहे की, भंडारा जिल्ह्यातील, तुमसर तालुक्यात येणारे गाव मौजा देव्हाडी, अंबागढ, सिहोरा, गररा बघेडा, डोंगरी बूज. येथे जिल्हा परिषदे अंतर्गत आठवडी बाजार भरतो,जिल्हा परिषद प्रशासन येथे आठवडी बाजाराचा लिलाव करतो, लिलावानंतर संबंधित ठेकेदारांना बाजार शुल्क दुकानदारांकडून घेण्याची रीतसर परवानगी मिळते, जिल्हा परिषद अंतर्गत अटी व शर्तीनुसार बाजार ठेकेदार यांनी दुकान दारांकडून बाजार शुल्क घ्यावे असे निर्देशित करण्यात येते, आठवडी बाजार परिसरात संबंधित ठेकेदाराने शुल्क आकारणीचा मोठा फलक लावणे अनिवार्य आहे, परंतु काही आठवडी बाजारात बाजार शुल्क घेण्याचा दर्शनिक फलक लावण्यात आलेला नाही. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, आणि या कारणाने तुमसर तालुक्यात दुकानदाराची ठेकेदारांकडून सर्रास लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार या पाच गावामध्ये सुरु आहे.
सदर गावातील बाजारात बाजार शुल्क आकारण्याचा फलक लावण्यात आलेला नाही, अशी अनियमितता सुरु असताना सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. मुदत संपल्या नंतरही काही आठवडी बाजारात दुकानदारांकडून बाजार शुल्क घेण्याचा प्रकार आढळून येतात हि एक धक्का दायक माहिती आहे. काही दुकानदारांकडून पैसे घेऊनही त्यांना पावती मिळत नाहीत, अशी बेबांशाही, गुंडागर्दी या पाच गावाच्या बाजारामध्ये सर्रास चालू आहे, आणि जिल्हा परिषद प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहेत, हा कोणता लोकशाही शासन आहे ? हे ठेकेदार हुकूमशाही चालवीत आहेत.
या कोरोना काळामध्ये रोजगार नाहीत, जिवन जगण्यासाठी पैसा नाही, मुलांचे आरोग्य, शिक्षण, आणि आपला उदरनिर्वाह कशा चालविता येईल याची काळजी घ्यावी लागेल, अशी भूमिका घेऊन समाजातील अनेक गोर गरीब मोलमजुरी करुन आपले कसं तरी प्रपंच चालवीत आहेत, आणि अश्या गोरगरीब दुकान दाराची सर्रास लूट होत आहेत, हा कुठला न्याय आहे, याची दक्षता घ्यावी अशी विनंती संपुर्ण दुकानदारांनी जिल्हा परिषद प्रशासन यांच्या कडे केली आहे,