महिलांनो संकटाशी दोन हात करायला शिका करायला शिका ओबीसी क्रांती मोर्चा अध्यक्ष शोभा बावनकर

महिलांनो संकटाशी दोन हात करायला शिका करायला शिका ओबीसी क्रांती मोर्चा अध्यक्ष शोभा बावनकर

महिलांनो संकटाशी दोन हात करायला शिका करायला शिका ओबीसी क्रांती मोर्चा अध्यक्ष शोभा बावनकर

✍मुकेश मेश्राम✍
जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
भंडारा
📱7620512045📱

भंडारा:-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन तसेच महिला दिनाचे औचित्य साधून आज गुरुवार ला ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्हा कार्यालयात 125 वा स्मृतिदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
थोर समाज सुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रीनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आज 125 वा स्मृतिदिन आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या आद्य महिला शिक्षिका होत्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या आयुष्यात आपले समाज सेवेसाठी जीवन व्यथित केले. दिनांक 10 मार्च रोज गुरुवारला स्मृतिदिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाच्या अवचित्य साधून ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य जिल्हा भंडारा कार्यलयात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.आणि भारतीय औषधी अनुसंधान संस्था मेन्स ऑफ रिसीप्ट केअर हॉम्स अँड हॉम्स फोर सेनियर सिटीझन्स खात रोड खोकरला येथील वृद्ध आश्रमात भेट देऊन वृद्ध महिलेशी त्याच्या आयुष्यातील जुन्या सुखद दुखण्याच्या आठवणीत उजाळा देत तिथल्या वृद्ध महिलांशी हितगुज साधत त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना जाऊन घेतल्या त्यावेळी त्यांनी जीवनाचा पदोपदी संघर्ष व कार्यकर्तृत्वातून सिद्ध करत कितीही मोठे कठीण परिस्थिती निर्माण झाले तरी आलेले संकट यापुढे हार न मानता त्वरित परिस्थितीशी झुंज देत कुटुंबाचे व समाजाला पुढे नेण्याची नेहमीच आत्मनिर्भर होऊन जीवन जगत उन्हाळा,पावसाळा हिवाळा असो आम्ही कधीच खचलो नाही थांबलो नाही निराश झालो नाही पण आज आमच्यावर ही परिस्थिती आली की आम्हाला मातृत्व प्रेम माहेर-सासर घर सोडून या अंतिम जीवनाच्या अंतिम सणाच्या वेळेस आश्रमामध्ये आसरा घ्यावा लागतो. अशा तिथल्या वृद्ध महिलांनी रडत भावनेतून आपली व्यथा मांडत ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिलांसोबत भावना व्यक्त केल्या.त्या वेळेस ओबीसी क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष शोभाताई बावणकर यांना अश्रू अनावर झाले नाही त्यांनी कमी वेळामध्ये येथील कार्यक्रमात आपल्या भाषणातून सांगितले एक महिला दुसऱ्या महिलेची कशी दुःख जाणून शकते व मनासंतापात ज्या मुलाला-मुलीला आपण आपल्या काळजातले अंतरआतम्यातून आई-वडील लहानाचे मोठे करून शिकून सवरून त्यांना मोठे करतात. मुले शिकून मोठे होतात जेव्हा त्याच मुला-मुलींना आई-वडील वृद्धावस्थेत येतात तेव्हा ते मूल-मुली आई वडिलांची देखभाल न करता वृद्ध आश्रमात सोडून देतात.पण येथील वृद्ध महिलांनी खचून न जाता संकटाशी झुज देऊन दोन-दोन हात करा असे प्रतिपादन केले.आणि कार्यक्रमाच्या शेवटी येथील वृद्ध महिला व पुरुषांना भेट वस्तू देण्यात आल्या.याप्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चा संयोजक अध्यक्ष संजय मते,संयोजक जीवन भजनकर,महिला अध्यक्ष शोभा बावणकर,गीता निखाडे,विद्या मदनकर कल्पना नवखरे,कपलना चांदेवार,पूजा सपाटे,रीनाताई, मीना कांबळे,अधीक्षक डोंगरे,मीना तुरस्कर,प्रमिला तिडके,श्वेता बावणकर,अरुणा बाहे,स्वीटी शेंडे,सीमा नंदागवळी,अनिल सुखदेवें,सुनील शहारे,राजपूत सर,कु.रिदा बावणकर उपस्थित होते.