आरोग्य विभागीय संचालकानी आयोजकांना सन्मानपत्र देऊन गौरवले

आरोग्य विभागीय संचालकानी आयोजकांना सन्मानपत्र देऊन गौरवले 

आरोग्य विभागीय संचालकानी आयोजकांना सन्मानपत्र देऊन गैरविले

✍मुकेश मेश्राम✍
जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
भंडारा
📱7620512045📱

भंडारा : राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे राज्य शासनाने रक्तदान शिबीर घेणेबाबतचे आव्हान सामाजिक संस्थांना केले होते. याअनुषंगाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त तुमसर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. सदर घेतलेल्या रक्तदान शिबीराबाबत जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नागपूर आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ रविशेखर धकाते यांनी आयोजकांना सन्मानपत्र देऊन गौरविले. यावेळी रक्तदान शिबीर आयोजक तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, युवासेना जिल्हा समन्वयक मनोज चौबे, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष पाठक, शाखा प्रमुख निखील कटारे, दीपक मलेवार, स्वप्नील बडवाईक सह शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निखील डोकरीमारे, सर्जन डॉ शेखर नाईक, तेजराम बन्सोड आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.