माणगांवमध्ये पोस्को कंपनीच्या कंटनेरची कडापे गावच्या उपसरपंचाच्या गाडीला जोरदार धडक ग्रामस्थांनी वाहतूक रोखली पोलीस घटनास्थळी दाखल
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
माणगांव :-माणगांव तालुक्यातील कडापे गावचे हद्दीत दि ९ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कडापे गावचे उपसरपंच प्रभाकर मानकर यांच्या ताब्यातील इनोव्हा कार क्रमांक ०६ सी बी एम १२०८ यांच्या गाडीला विळे भागाड पोस्को एम आय डी सी मध्ये कोईल वाहतूक करणारा कंटनेर क्रमांक एम एच ४६ बी यु ३६७२ यांनी ठोकर मारून अपघात केला आहे.
कडापे गावचे उपसरपंच प्रभाकर मानकर हे आपल्या कुटुंबीया सोबत मुबंई येते प्रवास करीत असताना पोस्को एम आय डी सी कंपनी जवळ हा अपघात झाला या अपघातात गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून मानकर कुटुंबीयांना किरकोळ दुखापत झाली आहे.पोस्को कंपनी जवळ वारंवार अपघात होत असल्यामुळे ग्रामस्थांनी रस्ता जाम करूनं ठेवला होता या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात कळताच माणगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या परिसरात तणाव निर्माण झाले परंतु माणगांव पोलीसानी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली.
या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात केली असून कॉ. गु रजि. नं ६३/२०२३ भा. द. वि कलम २७९,३३७ मो.वां. क.अधी १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलं असून माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास स. पो. नी लहागे व पो. ना.जाधव हे करीत आहेत.