महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सव वर्षाचे औचित्य साधून मुंबईत रॅलीचे आयोजन 

मीडियावार्ता 

मुंबई: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, प्रति कुलपती तथा मंत्री वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २५ वा रौप्य महोत्सव वर्षाचे औचित्य साधून आज जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने स्तन कर्करोग जनजागृती करण्यात आली .

याकरिता मुंबई शहर विभागातील वैद्यकीय दंत, आयुर्वेद, नर्सिंग असे २२ महाविद्यालयातील २३०० विद्यार्थी व 200 अध्यापकांच्या सहभागाने कालाघोडा ते सेंटजॉर्ज रुग्णालय परिसरा पर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मा. मंत्री गिरीशजी महाजन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, ग्रामविकास, पंचायतराज, युवक कल्याण विभाग हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. त्यांच्या सोबत इतर मान्यवर राजेंद्र निवतकर, आयुक्त, वैद्यकीय क्षिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य, डॉ. श्री. अजय चंदनवाले, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, महाराष्ट्र राज्य, डॉ. मिलिंद निकुंभ, प्र-कुलगुरु, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ, नाशिक श्रीमती डायना एडुलजी भूतपूर्व भारतीय महिला क्रिकेट कर्णधार, डॉ. अजीत गोपछडे, व्यवस्थापन परिषद सदस्य व रिजनल सेंटर प्रमुख मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तसेच टाटा हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ञ डॉ. शर्मा उपस्थित होते.

सदर प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे समन्वयन के. जी. मित्तल आयुर्वेद कॉलेज चर्नीरोड मुंबई तर्फे करण्यात आले होते. त्यामध्ये कॉलेज ट्रस्टी बादलजी मित्तल, अरुणजी मित्तल व अशोकजी मित्तल, संस्था सल्लागार वैद्य हरिप्रसादजी शर्मा, कॉलेजचे प्राचार्य डॉ. अजय साळुंखे , उपप्राचार्या डॉ. मंगल क्षीरसागर व सर्व अध्यापकांनी सक्रीय सहभाग घेऊन रॅली यशस्वी करण्यामध्ये सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here