कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते श्रीमंत पेशवे स्मारकच भूमिपूजन संपन्न
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड:- श्रीवर्धन येथील श्रीमंत पेशवे स्मारकाचे भूमिपूजन कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच खासदार सुनिल तटकरे यांच्याहस्ते संपन्न झाले यावेळी महिला व बालकल्याण मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पुष्करसिंह पेशवा, डॉ.तेजस दर्गे, महमद मेमन, जितेंद्र सातनाक, दर्शन विचारे, श्यामकांत भोकरे श्रीवर्धन न.प मुख्याधिकारी विराज लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच मराठा साम्राज्य हे रयतेच राज्य होत. आठरा पगड जातींना बारा बलुतेदारांना सर्व धार्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्यांची उभारणी छत्रपतींनी केली. ऐतिहासिक पद्धतीची उभारणी करत असताना अनेकवेळेला संघर्षाला सामोरे जावं लागलं होत. त्यानंतर श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे यांना पेशव्यांची सूत्र हातामध्ये दिल्यानंतर ऐतिहासिक लढाईत संबंध पेशवे घराण्याचा योगदान खूप मोठ्या प्रमाणावर होते. रायगडकर खूप भाग्यवान आहोत त्याच कारण छत्रपतीच्या स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला सुद्धा रायगडमध्ये त्यानंतर ज्यांच्याकडे पेशवाईची सूत्रे दिली गेली ते पेशवे देखील रायगड मधलेचे आहेत असं म्हणतं याचा सार्थ अभिमान व्यक्त केला.
यावेळी खा.सुनील तटकरे म्हणाले की, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना विनंती केली होती. पेशवे स्मारका संदर्भात बैठक लावली. त्यावर त्यांनी बैठक लावून त्यास तत्वता मान्यता देखील दिली होती याचा आवर्जून उल्लेख करतो. त्याकालावधीत लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट यांच्या मनात गैरसमज होते ते दूर करण्यात कुठेतरी यश मिळाल नाही. मात्र आज ना.आदिती तटकरे हीच्या पुढाकारातून आज श्रीमंत पेशवे यांच नैत्रदीपक आस स्मारक उभ राहतंय हे श्रीवर्धनच्या वैभवात पडलेली भर असल्याच मत यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केल.जगाच्या पाठीवर नेपोलीयन, आलेक्सझेंडर शूर होऊन गेले मात्र अभिमान पूर्वक सांगतो की यांच्यापेक्षा मोठे शूर वीर होऊन गेले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर श्रीमंत बाजीराव पेशवे आणि त्यांच्या पुढील पिढीने स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास अबधित ठेवला. त्यामुळे याठिकाणी होणारा पेशवे स्मारक अशा पद्धतीच उभ राहील की फक्त महाराष्ट्रापुरत सीमित नसून देशभरातील इतिहासप्रेमी याठिकाणी आले पाहिजेत.